Home चंद्रपूर दर्दनाक:- अखेर एकतर्फी प्रेमाची बळी ठरलेल्या युवतीने प्राण सोडला.

दर्दनाक:- अखेर एकतर्फी प्रेमाची बळी ठरलेल्या युवतीने प्राण सोडला.

 

मारेकऱ्याला फाशी द्या व त्यासाठी ही केस फॉस्टट्रैक न्यायालयात चालवा या मागणीला घेऊन बाबुपेठ परिसरात चालले तीन तास आंदोलन.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

आज एकतर्फी प्रेमात युवकाने चाकुने हल्ला करून जखमी केलेल्या 18 वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. त्यानंतर सायंकाळ ला 5 ते 6 च्या दरम्यान युवतिचे पार्थिव शरीर बाबूपेठ येथील नेताजी चौकात आणण्यात आले. यावेळी आरोपीला फाशी दया या मागणीसह इतर मागण्यांना घेवून कुटुबींयासह बाबूपेठ येथील नागरिकांनी आंदोलन सुरु केले.

एकतर्फी प्रेमातून विवाहीत असलेल्या 35 वर्षीय प्रफुल आत्राम या नराधमांने बाबुपेठ येथील 18 वर्षीय युवतीवर चाकुने प्राणघातक हल्ला केला. काही दिवसांच्या उपचारा नंतरही डाॅक्टरांना सदर युवतीने प्राण वाचविता आले नाही. विषेश म्हणजे सदर युवकाने या आधी युवतीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी युवतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी आरोपी युवकावर कोणतीही कार्यवाही केली नाही. असा आरोप कुटुबीयांनी केला आहे. दरम्याण आज मृत युवतीचे पार्थिव शरीर बाबुपेठ येथील नेताजी चौकात ठेवून नातलगांसह बाबूपेठ वासियांनी आंदोलन सुरु केले. सदर आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, प्रकरण जलत गतीच्या कोर्टात चालविण्यात यावे, दोषी पोलिस अधिकारी, कर्मचा-यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जवळपास तिन तास हे आंदोलन सुरु राहिले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता येथे मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांना कळताच त्यांनी सदर ठिकाण गाठून मध्यस्ती केली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनाही बोलाविण्यात आले. आ. जोरगेवार यांनी कुटुंबीयांशी चर्चा करत त्यांच्या मागण्या एकून घेतल्या तसेच यावेळी त्यांनी कुटुंबाला आर्थिक मदत केली. सदर प्रकरण जलत गतीच्या कोर्टात चालविण्यासाठीची प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल, शासणातर्फेही पिडीत कुटुंबाला मदत मिळण्यासाठी पाठपूरावा करील, चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल, बाबुपेठ येथे पोलिस चौकी सुरु करण्यात येईल असे आश्वासन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. त्यानंतर कुटुंबीयांनी युवतीचे पार्थिव नेताजी चौकातून हलवून अंत्यविधीच्या प्रक्रियेकरीता घरी नेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here