Home वरोरा आली गौराई आली, लक्ष्मी पावली घरोघरी पूजा सुरू झाली

आली गौराई आली, लक्ष्मी पावली घरोघरी पूजा सुरू झाली

 

(खांबाडा)मनोहर खिरटकर:-

आज जेष्ठा गौराई पुजन, घरोघरी मंगलमय वातावरणात आली गौराई आली, श्री गणेशाच्या आगमणानंतर आपल्या माहेरी येणार्या गौराईचे रविवार दिनांक १२ ला महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात मंगलमय वातावरणात सौभाग्यवतीने स्वागत केले, पांरपारिक पध्दतीने महालक्ष्मीचा आदर संत्कार करत पुजन केले आज सोमवारी गौराईचे महापुजन होणार असुन त्यांना नैवेद्ध दाखविण्यात येईल गौराई अर्थात महालक्ष्मीचे आगमन हा महिलाचा जिव्हा‌ल्याचा सण असतो पण यंदाही या सणावर कोरोनाचे सावट असले तरी महिलाचा उत्साह काही कमी झाला नाही, घराघरात महालक्ष्मीच्या स्वागतासाठी नाविण्यपुर्ण सजावट करण्यात अली आहे, गणराया पाठोपाठ रविवारी जेष्ठ आणि कनिष्ठ माहेरवाशीनी म्हणुन प्रत्येक घरात दाखल झाल्या काही घरामध्ये पारंपरिक पध्दतीने शाडुच्या,पितलेच्या तर काही ठिकाणि सात खड्याच्या रूपात गौरीचे आगमण झाले बाजारपेठेत गौराईच्या दागिण्याचे असंख्य प्रकार उपलब्ध असल्याने महिलानी यंदाही गौराईसाठी नवनविन दागिने खरेदिवर भर दिलेला दिसतो आकर्षक रोषणाई ,फराळाची आरास,सजविलेल्या घरामध्ये साड्या,नवनविन दागिने परिधान करून दाखल झालेल्या गौराईने वातावरणात चैतन्यमय रंग भरले ,गौराईचे घरामध्ये आगमन झाल्यानंतर हळदीच्या ठशानी चंदनाचे बोट लावलेल्या पावलाचे ठसे घरभर उमटवले,कि त्याला गौरी चालवणे कहे म्हणण्याची प्रथा आजतागायत जिंवत दिसते. विविध रंगाच्या फुलाची आरास करून सजावट केलेल्या गौराईचे स्वागत करताना गौरी चालवण्याची प्रथा आजतागायत आवर्जुन पाळली जाते

Previous articleधक्कादायक :- एकाने पेट्रोल पंपांच्या नौकराला मूर्ख बनवत चार चाकीत ३०००/- रुपयाचे डिझेल भरून केला पोबारा.
Next articleमहत्वाची बातमी :- माजरीच्या रेल्वे गेटवरुन वाहतूक सोमवारी ते मंगळवारला सकाळपर्यंत बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here