Home गडचांदूर धक्कादायक :- एकाने पेट्रोल पंपांच्या नौकराला मूर्ख बनवत चार चाकीत ३०००/- रुपयाचे...

धक्कादायक :- एकाने पेट्रोल पंपांच्या नौकराला मूर्ख बनवत चार चाकीत ३०००/- रुपयाचे डिझेल भरून केला पोबारा.

 

राजुरा येथील डी.आर कोतपल्लीवार यांच्या पेट्रोल पंप वरील घटना.

राजुरा प्रतिनिधी :-

देशात वाढलेल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती आणि त्यामुळे सर्वसाधारण लोकांच्या खिशाला बसत असलेली कात्री यामुळे काही लोक आपल्या भन्नाट आयडियाचा वापर करून आपल्या गाड्यांची पेट्रोल डिझेलची भरपाई करतात अशीच एक भन्नाट आयडिया राजुरा येथील कोतपल्लीवार यांच्या पेट्रोल पंपावर घडली असून पेट्रोल पंपावर असलेल्या नौकराला ३०००/- रुपयाचे डिझेल भरल्यानंतर तू एटिएम मशीन घेऊन ये म्हणून सांगत एका निनावी चार चाकी वाहन चालकांने पोबारा केल्याची खळबळजनक घटना काल राजुरा येथे समोर आली.

गाडीत डिझेल भरून पोबारा करणारा भामटा हा भरधाव वेगाने गाडी घेऊन पळाला असल्याने त्याचा शोध घेण्यास पेट्रोल पंपावरील नौकर व कर्मचारी हे अयशस्वी ठरले असल्याने त्या डिझेल च्या पैशाची भरपाई या बिचाऱ्या नौकराला द्यावी लागल्याने कुण्या गरिबांचे पैसे लुटून चार चाकी गाडीवाले असा पळ काढत असेल तर विश्वास ठेवायचा कुणावर? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here