Home चंद्रपूर हत्त्या झालेल्या वैष्णवी आंबटकर हिने पुर्वी दिलेल्या तक्रारीवर दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर...

हत्त्या झालेल्या वैष्णवी आंबटकर हिने पुर्वी दिलेल्या तक्रारीवर दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करा.

 

मनसेचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन.

चंद्रपूर प्रतिनिधी  :-

बाबुपेठ परिसरात राहणारी स्व. वैष्णवी उर्फ बनश्री अशोक आंबटकर हिचेवर प्रफुल्ल आत्राम (३४) यांनी गुरुवार दि. १ सप्टेंबर रोजी महाकाली मंदिर परिसरात एकतर्फी प्रेमातुन चाकुने हमला केला. या हमल्यानंतर १२ सप्टेंबर ला वैष्णवी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महत्वाचे म्हणजे प्रफुल्ल आत्राम यांच्याविरोधात बुधवार दि. १ ऑगस्ट रोजी पिडीत मुलीने आपल्या आईच्या उपस्थितीत रामनगर पोलिस स्टेशन मध्ये प्रफुल्ल आत्राम याच्या विरोधात माझी छेडछाड करीत असून माझ्या जिवाला प्रफुल्ल आत्राम याच्यापासून धोका असल्याची तक्रार दिली होती. पण रामनगरच्या पोलीसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला नाही किंव्हा त्याला साधी समज सुद्धा दिली नाही, कारण त्यावेळी जर आरोपीला पोलीस स्टेशन ला बोलावून त्याला दम भरला असता तर त्याची त्या मुलीवर जीवघेणा हल्ला करण्याची हिंमत झाली नसती त्यामुळे मयत वैष्णवी आंबटकरहिच्या मृत्यूला पोलीस प्रशासन तेवढेच जबाबदार असून मुलीच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणे आवश्यक आहे अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.

माझ्या विरोधात तक्रार का दिली याचा आकस घेऊन मुलगी व तिच्या आईने १ सप्टेंबर रोजी या गंभीर प्रकरणावर दिलेल्या तक्रारीनंतर वैष्णवी उर्फ वनश्री अशोक आंबटकर या मुलीवर ९ दिवसानंतर भर वस्तीमध्ये प्रफुल्ल आत्राम याने वैष्णवी हिचे वर चाकूने वार केला. रविवार दि. १२ सप्टेंबर रोजी वैष्णवी चा यामध्ये मृत्यू झाला. प्रफुल्ल आत्राम यांच्या विरोधात १ सप्टेंबर रोजी रामनगर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती, या तक्रारीची रामनगर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असती तर कदाचित वैष्णवी हिचा जिव वाचु शकला असता. ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणाचे वर्तन केले, त्याची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, तसेच आरोपी प्रफुल्ल आत्राम याला फाशीची शिक्षा देण्यासाठी सबळ पुरावे न्यायालयात सादर करावे, जेणेकरून दुसऱ्यांदा असे प्रकरण करताना कुठल्याही आरोपीला त्या शिक्षेची आठवण येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी मनविसे शहर उपाध्यक्ष पियुश धुपे, जिल्हा सचिव किशोर भाऊ मंडपूवार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, राज वर्मा, वमशी रुद्रारपू, दुमदेव मरस्कोल्हे इत्यादींची उपस्थिती होती.

Previous articleउपक्रम :- हरित मित्र परिवाराचे धनराज चाफले यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस
Next articleखळबळजनक :- चंद्रपूर जिल्हा परिषदमधे पुन्हा नौकरी लावून देण्याच्या नावाखाली युवतीची फसवणूक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here