Home वरोरा उपक्रम :- हरित मित्र परिवाराचे धनराज चाफले यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला...

उपक्रम :- हरित मित्र परिवाराचे धनराज चाफले यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस

 

हरित क्रांतीचा संदेश असाच सुरू राहिल्यास वरोरा तालुका इतिहास घडवेल.

वरोरा प्रतिनिधी :-

आपल्या वाढदिवशी अनेक लोक केक कापून व मटण चिकन च्या पार्ट्या देतात प्रसंगी दारूच्या नशेत वाढदिवसाची रंगतदार पार्टी वेगळे वळण घेऊन कधी कधी संकटे निर्माण करतात पण हरित मित्र परिवाराचे किशोर ऊत्तरवार यांनी वरोरा तालुक्यात एक नवा पायंडा रचला असून तालुक्यातल्या अनेक मान्यवरांचे वाढदिवस हे चंदनाचे व इतर विविध प्रकारचे झाडे लावून किंव्हा ती झाडे भेट देवून आपला वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम चालवला आहे.

अशाचा प्रकारचा खूप सुंदर असा उपक्रम मागील 6 वर्षापासून चालू आहे, त्यांचे ब्रीद वाक्य असे आहे की सहयोगातून हरित क्रांतीकडे अर्थात हरित मित्र परिवार संयोजक किशोर उत्तरवार व त्यांचे मित्र धनराज चाफले यांची खूप दिवसापासूनची इच्छा होती की धनराज यांनी आपल्या वाढदिवसानिमित्य इतरत्र खर्च न करता हरित मित्र परिवारातील सहयोगी मित्र परिवाराला सोबत घेऊन वरोरा हद्दीतील एकर्जुना ग्राम पंचायत पद्मालय नगर येथे दूतर्फी स्वखर्चाने काजू, रक्त चंदन, पेरू व लिंब ही झाडे लावावी आणि हा उपक्रम त्यांनी घेतला.

या वाढदिवसानिमित्य कार्यक्रमात सरपंच थेरे ताई तसेच ग्रामसेवक घुगल ताई व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे त्यांनी तोंडभरून कौतूक केले तसेच उपस्थित मित्रांनी सुद्धा आपाआपला वाढदिवस याच पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला या प्रसंगी लक्ष्मण चिंचोळकर, ठेंगेने, मडावी सर, बाळा पाचभाई, विलास चिकाटे, जयंत चंदनखेडे, गणपत किंहाके व मित्र परिवार उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here