Home चंद्रपूर खळबळजनक :- चंद्रपूर जिल्हा परिषदमधे पुन्हा नौकरी लावून देण्याच्या नावाखाली युवतीची फसवणूक.

खळबळजनक :- चंद्रपूर जिल्हा परिषदमधे पुन्हा नौकरी लावून देण्याच्या नावाखाली युवतीची फसवणूक.

 

बल्लारपूर येथील ब्रिजेशकुमार बैधनाथ झा ह्या भामटय़ांनंतर पुन्हा काही भामटे यामधे सक्रिय?

चंद्रपूर प्रतिनिधी : –

चंद्रपूर जिल्हापरिषद मधे नौकरी लावून देतो म्हणून बल्लारपूर शहरातील काही बेरोजगार युवकांना लाखों रुपयांचा गंडा घालणाऱ्या बल्लारपूर शहरातील ब्रिजेशकुमार बैधनाथ झा यांच्या विरोधात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली शेठी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम वाखर्डे यांनी रामनगर पोलीस स्टेशन मधे तक्रार करून गुन्हा दाखल केला असल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली असतानाच आता पुन्हा एक भामटा जिल्हा परिषद आणि चंद्रपूर पंचायत समिती मधे नौकरी लाऊन देतो म्हणून एका युवतीकडुन चक्क २ लाख रुपये घेतल्याचा व आता तो भामटा फरार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

झा यांनी चंद्रपूर जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागातील वर्ग 3 च्या कर्मचारी व वर्ग ४ या पदाच्या जागा असल्याचा बनाव करून बल्लारपूर शहरातील बेरोजगार युवकांकडून लाखों रुपये घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरीचे नियुक्ती आदेश असलेले नियुक्ती पत्र दिले होते ते पत्र घेऊन सुशिक्षित बेरोजगार युवक जिल्हा परिषद आरोग्य विभागात गेले असता अशी कुठलीही नियुक्तीचे आदेशच निघाले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले तेंव्हा त्या बेरोजगार युवकांच्या पायाखालची जमीन सरकली होती व नंतर जिल्हा परिषद प्रशासनाला स्वतःहून पोलिसांकडे तक्रार दाखल करून त्या झा नावाच्या भामटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गोष्टीला अवघे ४८ तास उलटत नाही तोच आता दुसरा मामला समोर आला असून एका भामटय़ांनी बाबुपेठ येथील एका युवतीचे २ लाख रुपये नौकरी लावून देण्याच्या नावाखाली देऊन फसवणूक केली आहे.

आता या प्रकरणात संबंधित पीडित युवतीने त्या नौकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भामटय़ांचा मोबाईल जप्त करून तो शहर पोलीस स्टेशन मधे जमा केला होता व आज दिनांक १६ सप्टेंबरला शहर पोलीस स्टेशन मधे तक्रार दाखल केली असून आरोपींवर गुन्हा सुद्धा दाखल झाला असल्याची माहिती आहे. या जिल्हा परिषद मधे नौकरी लावून देण्याच्या घटना आता वाढायला लागल्या असून यामधे जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी यांचा हात असल्याचे व अनेक बेरोजगार यांची फसवणूक झाली असण्याची दाट शक्यता वाटत आहे त्यामुळे पोलिसांनी ही बाब गंभीरतेने घेऊन बेरोजगार युवकांना युवतींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here