Home महाराष्ट्र सनसनीखेज :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्यांने उडाली खळबळ.

सनसनीखेज :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्यांने उडाली खळबळ.

 

राज्यात सत्ता परिवर्तन होण्याचे संकेत की मी पुन्हा येईन चा तो जुना नारा? .

न्यूज नेटवर्क :-

महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजपला नेहमी सत्ता स्थापनेचे झटके येत असतात कधी हे सरकार एका महिन्यात पडणार आहे तर कधी आठवड्या भरात हे पडणार म्हणून भाजप चे चंद्रकांत पाटील असो की मागच्या दराने खासदार झालेले व आता केंद्रीय मंत्री झालेले नारायण राणे असो या भाजपवाल्यांना सत्ता स्थापनेचा अट्टाहास काही केला कमी होत नाही अशातच आता भाजपचे राज्याचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुण्यातील गुरुवारी एका कार्यक्रमात उल्लेख माजी मंत्री म्हणून करण्यात आला तेंव्हा चंद्रकांत पाटील यांनी माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करु नका, असे म्हटले होते त्यामुळे सर्वांच्याच भुवया चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे उंचावल्या आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा भाजप सरकार येणार की दुसरा काही मोठा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा देखील रंगू लागली आहे.

चंद्रकात पाटील पुढे म्हणाले की मला माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल.अर्थात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत पाटील पुण्यातील देहूगाव येथे एका खासगी दुकानाच्या उद्घाटना प्रसंगी आले होते, तेव्हा त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. सूत्र संचालन करणाऱ्या व्यक्तीने उद्घाटन करण्याच्या अगोदर माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन होत असल्याचे म्हटले, तसेच वारंवार तसाच उल्लेख केला. त्यानंतर उद्घाटनासाठी रिबीन कापणार त्याच वेळी चंद्रकांत पाटील यांनी हे सूचक वक्तव्य करत माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल असे म्हटले आहे.

चंद्रकात पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, त्यांनी केलेल्या सूचक वक्तव्याचा नेमका अर्थ काय आहे हे येणाऱ्या दोन-तीन दिवसात कळेल. तसेच विरोधक देखील त्यांच्या सूचक वक्तव्याकडे कसे पाहतात, हे देखील पाहावे लागणार आहे.

Previous articleखळबळजनक :- चंद्रपूर जिल्हा परिषदमधे पुन्हा नौकरी लावून देण्याच्या नावाखाली युवतीची फसवणूक.
Next articleमहत्वाची बातमी:- विसलोनच्या रेल्वे गेटवरुन वाहतूक दोन दिवस बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here