Home महाराष्ट्र धक्कादायक :- नराधम बापाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार.

धक्कादायक :- नराधम बापाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार.

 

नराधम बापा विरुद्ध भादवि कलम ३७६ (३),३७६(२)जे,३७६(२)(एफ) व अन्य कलमान्वये गुन्हे दाखल.

क्राईम ब्लास्ट:-

माणसाने आपली माणुसकी हरवली पण आता नीतिमत्ता आणि आपले रक्ताच्या नात्याला पण काळिमा फासली असल्याची धक्कादायक घटना यवतमाळ शहरातील शिंदे प्लाॅट येथे घडली आहे. ५० वर्षीय नराधम बापाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आल्यानंतर जा समाज नेमका जात कुठे आहे? हेच कळायला मार्ग नाही.

अवधुतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हा पत्नी आणि दो मुलीसह एकत्र राहतो. आरोपीचे नाव सफिक रोजा अन्सारी वय ५० वर्ष असून तो आपल्या कुटुंबासह यवतमाळ शहरातील शिंदे प्लॉट शहा हॉस्पिटल नजीक राहत असून पीडित मुलगी ही गोधणी रोडवरिल शाळेत दहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपीला दारू पिण्याचे वाईट व्यसन असून तो सतत पत्नीसोबत किरकोळ कारणावरून भांडत असतो तसेच मारहाण सुद्धा करतो व मुलींसोबत देखील वाद करतो.मुली वडिलांना घाबरत असल्यामुळे यापूर्वी त्यांनी कधीही तक्रार केली नाही.मात्र आरोपी हा पीडित मुलीकडे नेहमीच वाईट नजरेने बघायचा तसेच ती आंघोळीला गेला की लपून-छपून तिला आंघोळ करतांना पहायचा अशाप्रकारे त्या मुलीला तो त्रास देत होता एके दिवशी हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात येताच तिने म्हटले की तुम्ही हे काय करता ती आपली मुलगी आहे.या कारणावरून त्या नराधम वडिलांनी पत्नीस बेदम मारहाण केली.

असाच एक प्रकार दिनांक १९ सप्टेंबरच्या रात्री च्या दरम्यान सर्वांनी जेवण केल्यानंतर लाईट बंद करून झोपले असता रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान नराधम वडिलांनी मुलीला आवाज देऊन माझ्या जवळ ये असे म्हटले मुलीने कशाला आवाज दिला असे म्हटले असता ती दुसऱ्या रूम मध्ये चल काही तरी काम असेल म्हणून ती मुलगी त्याच्या सोबत दुसऱ्या रूममध्ये गेली व त्या वेळी त्यांनी तिला एकदम कपडे काढ असे म्हटले तेव्हा ती रडत रडत कपडे का काढू असे म्हटले असता रडण्याच्या आवाजाने मुलीची आई सुद्धा जागी झाली तिने वडिलांना म्हटले कि तुम्ही हे काय प्रकार करत आहे. तेव्हा मुलीच्या आईला दुसऱ्या रूम मध्ये ढकलून दिले व मुली सोबत जबरदस्तीने कपडे काढून खुर्चीवर बसून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.

ही घटना दुसऱ्या दिवशी मोठ्या बहिणीला सांगितले असता या घटनेवरून दि.२० सप्टेंबर रोजी पीडित मुलीला घेऊन अवधूत वाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली असून नराधम बापा विरुद्ध भादवि कलम ३७६ (३),३७६(२)जे,३७६(२)(एफ) भादवि सह कलम ४,५(एन)६ बा.लैं.अ.सं अधिनियम २०१२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास अवधूत वाडी पोलीस करीत आहे

Previous articleसनसनीखेज :- हार्ट अटॅक आने से एक महिने पाहिले मिल सकती है ये 6 चेतावणी.
Next articleउपक्रम :- रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने कॅन्सरग्रस्त व नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here