चोरा, मुधोली, कोंढेगाव, भामढेळी, बेलगाव, आष्टा, टेकाडी, चंदनखेडा गावातील गावक-यांशी संवाद.
भद्रावती प्रतिनिधी ;-
स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील जनतेला आरोग्य व आकस्मिक संकटात नेहमी मदतीचा हात दिल्या जात आहे, अशातच भद्रावती तालुक्यातील चोरा, मुधोली, कोंढेगाव, भामढेळी, बेलगाव, आष्टा, टेकाडी, चंदनखेडा गावातील गावक-यांशी सीडीसीसी बैँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी संवाद साधला. सोबतच कॅन्सरग्रस्त रूग्ण राजेन्द्र सिडाम, मुत्रपिंडाचा आजार असलेले सोमेश्वर पेंदाम यांना ट्रस्ट तर्फे आर्थीक मदत करण्यात आली.तसेच चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक चंद्रपुर बँकेच्या शेतकरी कल्याण निधीतुन त्वरित मदत करण्यात येणार असल्याची ग्वाही देण्यात आली.
रवींद्र शिंदे यांनी संवाद साधतांना सांगितले की कोरोनाने मृत झालेल्या व गरीब गरजु पालकांच्या पाल्यांच्या लग्नाचा खर्च ट्रस्ट करणार आहे. त्यासाठी येत्या १३ ऑक्टोबर पासून नोंदणी सुरु करण्यात आली. यावेळी दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवि शिंदे, डॉ. बोबडे, आत्राम, बाळासाहेब पडवे, बंडू नन्नावरे, विजय वानखेडे, सोमेश पेंदाम, तुळशिराम श्रीरामे, केशवराव जांभुळे, ॲड. अमोल जिवतोडे, रविंद्र घोडमारे, तुळशिराम काळमेघे, विकास दोहतरे, वैशाली सीडाम, यशवंत गायकवाड, एकनाथ बावणे, मोनाली घरत, शुभांगी चौधरी, सुनिता नन्नावरे, वर्षा रणदिवे, शुभांगी चौखे, लता दाभेकर, तारा कारमेघे, भुषण सहारे, अमोल गेडाम, शुषमा जिवतोडे, शामल नन्नावरे, विजय बोभरे, शितल दाभेकर, माधुरी तोडासे, सुषमा ढोक, मंगेश कोवे, पवन ठाकरे, बुराण आदी उपस्थित होते.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बोबडे यांनी सांगितले की या परीसरात ब्रिस्ट कॅन्सर चे प्रमाण अधिक आहे. येथे उपचार, जागृती व मदतीची गरज आहे. यावर ग्वाही दिली की, या क्षेत्रात ट्रस्टच्या माध्यमातून लवकरच शिबिर घेण्यात येइल व जमेल ती मदत करण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात येईल.