Home क्राईम स्टोरी संतापजनक :- वरोरा तालुक्यातील टाकळी येथील गुंडाकडून महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न.

संतापजनक :- वरोरा तालुक्यातील टाकळी येथील गुंडाकडून महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न.

 

ब्लाऊज फाडले, साडी ओढली व रॉड ने डोक्यावर केला वार.

वरोरा पोलिसांचा गुन्हेगारांना अभय शिवाय वाचवायला गेलेल्या गावकऱ्यांनाच केले गजाआड?मारेकरी गुंड मात्र मोकाट?

वरोरा  प्रतिनिधी :-

वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या टाकळी या गावात माणुसकीला कलंकित करणारी भयंकर घटना घडली असून या घटनेवर पडदा टाकणाऱ्या वरोरा पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका महिलेवर टाकळी या गावातील दशरथ, किसन, रवी, पुरुषोत्तम, राहुल, प्रवीण, मनोज, वसंता व अक्षय खारकर या गुंडांनी हल्ला करून तिला नग्न करण्याचा व तीचेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने आपली अब्रू वाचविण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपींनी तिच्या डोक्यावर लोखंडी रॉड ने वार करून तिला जबर जखमी केले असल्याची संतापजनक घटना काल रात्री 7 च्या दरम्यान घडली असून बायकोला वाचविण्यासाठी आलेल्या नवऱ्याला सुद्धा बेदम मारहाण केल्याने नवरा बायको दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यात महिलेची प्रक्रुती चिंताजनक असून रक्तस्राव अजून बंद झाला नसल्याने डॉक्टर कसोशीने प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे.

काल सायंकाळी 7 च्या दरम्यान पीडित महिलेचा 12 वर्षीय मुलगा आपल्या कुत्र्याला घेऊन दुकानाकडे बिस्कीट आणण्यासाठी गेला होता त्या दरम्यान वरील आरोपी पैकी एकाने त्याला मारले व महिला एकटी घरी असल्याची संधी साधून वरिल आरोपीं गुंडांनी तिच्या घरावर हल्ला केला व तिला नंगी करून तीचेवर बलात्कार करा व तिला ठार करा असे काही गुंडांनी आदेश देताच सगळ्यांनी त्या महिलेचे ब्लाऊज फाडले कुणी तिची साडी ओढली तर काहींनी तिच्या शरीरावर वार करून नंतर ती ऐकत नाही असे बघून तिच्या डोक्यावर लोखंडी रॉड ने वार करून तिला जबर जखमी केले दरम्यान तिचा पती स्वताच्या पत्नीला वाचवायला आला असता त्याला पण जबर मारहाण केली त्यामुळे काही गावकरी पती पत्नीला वाचविण्यासाठी गेले तेव्हां आरोपी पसार झाले.

वरोरा पोलिसांचा उलटा न्याय?

पती पत्नीला बेदम मारहाण व त्यातच आरोपी कडून महिलेची अब्रू लुटण्याच्या प्रयत्न होत असतांना गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करून आरोपींना बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र वरोरा पोलीसानी त्या मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना पोलीस कस्टडीत टाकल्याची माहिती असून वरोरा पोलीसांनी आरोपींना वाचविण्यासाठी खुद्द हा खेळ खेळल्याची चर्चा आहे. काल पासून गंभीर असलेल्या महिलेची विचारपूस वरोरा पोलीसांनी केली नाही पण आरोपींनी सांगितल्या प्रमाणे मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना पोलीसांनी अटक केल्याने व आरोपींना मोकाट सोडल्याने वरोरा पोलीस हे कर्तव्याचे पालन न करता खाकी वर्दी ला बदनाम तर करत नाही? हा प्रश्न आता उभा ठाकला आहे. उद्या मात्र टाकळी गावातील नागरिक व काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती असून हे प्रकरण हाताळणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यावर आता वरिष्ठांकडून कुठली कारवाई होते हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here