एका शिवसेनेच्या नेत्यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ.
इंटरनेट न्यूज नेटवर्क :-
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप नेते किरीट सोमय्या व महा विकास आघाडीच्या नेत्यात घमासम सुरू आहे. एरव्ही भाजप शिवसेना युतीच्या देवेंद्र फडणवीस सरकार मधील पाच वर्षाच्या काळात तत्कालीन भाजपचे खासदार असलेले किरीट सोमय्या महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही डोकावले नाही आणि तोंडात बूचका भरल्यासरखे असायचे पण जशी भाजपची महाराष्ट्रातील सत्ता गेली आणि किरीट सोमय्या यांना जणू 36 हत्तीचं बळ आलं आणि त्यांनी महा विकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदार खासदार यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढायला सुरुवात केली. त्यात राष्ट्रवादीचे नेते तथा माजी ग्रूहमंत्री अनिल देशमुख हे त्यांचे पाहिले बळी ठरले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांना 2019 च्या निवडणुकीत भाजप ने लोकसभेची उमेदवारी दिली नव्हती ती शिवसेना नेत्यांच्या म्हणण्यानुसार दिली गेली नाही याचे शल्य त्यांना आहेच शिवाय पंतप्रधान मोदी आणि शहा यांना महाराष्ट्रात भाजप ची सत्ता गेल्याने संताप आहेच त्यामुळे त्यांनी किरीट सोमय्या यांना महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर व नेत्यावर ईडी च्या कारवाया लावण्यासाठी भ्रष्टाचाराचे पुरावे गोळा करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी दिली की काय? असाच प्रश्न पडतो आहे आणि त्याला कारणेही तेवढेच सटीक आहे आणि ते महाराष्ट्रातील जनतेला दिसतेय. कारण सुरुवातीला राज्याचे ग्रूहमंत्री अनिल देशमुख यांचा बळी घेतल्यानंतर त्यांनी त्या कांड मधे असलेल्या सचिन वाझे यांच्या सम्पतीच्या चौकशीची मागणी केली व त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना टार्गेट केले.मग हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावई यांच्यावर आरोप केले आणि आता राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांच्याकडून होत आहे. त्यामुळे मोदी शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली किरीट सोमय्या यांची महा विकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यावर आरोपांच्या फैरी सुरू आहे.
किरीट सोमय्या यांच्या राज्यात सुरू असलेल्या केंद्रातील इडिच्या आधारावर उचापती बघता शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी दावा करताना म्हटले आहे की किरीट सोमय्या हा मूर्ख माणूस आहे, आज केंद्रात भाजपच सरकार आहे म्हणून ते शिवसेनेच्या मंत्र्याच्या चौकश्या लावताहेत पण जर उद्या आम्हच केंद्रात सरकार आलं तर ह्याच किरीट सोमय्याला विदेशात पळून जाव लागेल.व्या संदर्भातील काही पत्रकारांच्या प्रतिक्रिया सुद्धा बोलक्या आहेत.त्यात काहींचे तर असे सुद्धा म्हणणे आहे की केंद्रात काँग्रेस आघाडी सरकार आले तर मोदी शहा यांना सुद्धा विदेशात पळून जावे लागेल कारण ज्या पद्धतीने भाजपने इडिचा वापर केला तोच वापर जर काँग्रेस आघाडी सरकारने केला तर मोदी शहा चे कारणामे समोर येऊ शकते.