फिर्यादी संजय सोनवणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देणार?
आरोपीकडून चोरलेला मोबाईल विकत घेणाऱ्या विशाल खेडेकर पोलिसांच्या ताब्यात?
भद्रावती प्रतिनिधी :-
सद्ध्या जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर चोरट्यांकडून आता घरफोड्या व दुकान फोड्या वाढल्या असल्याचे चित्र असून तत्कालीन अवैध दारू विकणारेचआता भुरटे चोर बनले असल्याचे दिसत आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे भद्रावती पोलीसांनी या चोरांशी अभद्र युती चालवल्याची बाब आता समोर येत आहे.
हनुमान नगर फुकट नगर वार्डात काही दिवसापूर्वी संजय सोनवणे यांच्या दुकानातून मोबाईल फोन सहित एकूण चाळीस हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी साफ केला होता. याबद्दल त्यांनी भद्रावती पोलीस स्टेशन मधे तक्रार केली मात्र पोलिसांनी आरोपीच्या छडा लावला नाही. दरम्यान चोरीला गेलेला मोबाईल फोन हा विशाल खेडेकर याच्याकडे सापडला असता त्यांनी हा मोबाईल सुमित तेलंग यांच्याकडून घेतल्याचे फिर्यादी संजय सोनवणे यांना सांगितले. याबद्दल पोलीस स्टेशन मधे फिर्यादीने माहिती सुद्धा दिली परंतु पोलीसांनी केवळ ज्याच्या कडे मोबाईल फोन मिळाला त्यालाच ताब्यात घेतले पण ज्यांनी चोरी केली त्याला मात्र पोलीसांनी अटक केली नाही उलट तुझा फोन असल्याचा पुरावा म्हणून बिल घेऊन ये असे म्हणून संजय सोनवणे या फिर्यादीला सांगून या प्रकरणाला थंड बस्त्यात टाकण्याचा भद्रावती पोलिसांचा डाव असल्याची प्रतिक्रिया संजय सोनवणे यांनी दिली आहे.
आरोपी असलेल्या सुमित तेलंगचे वडील पोलिसांत?
संजय सोनवणे यांचा ठेला फोडून जवळपास चाळीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेणारा सुमित तेलंग हा पोलीस कर्मचारी यांचा मुलगा असल्याची बाब समोर येत असून जाणीवपूर्वक सुमित ला भद्रावती पोलीस अटक करीत नसल्याचा आरोप फिर्यादी संजय सोनवणे यांनी केला आहे. ही घटना व या घटनेतील आरोपी समोर असताना सुद्धा भद्रावती पोलीस फिर्यादी संजय सोनवणे यांना जाणीवपूर्वक त्रास देऊन आरोपी सुमित तेलंगला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सुद्धा संजय सोनवणे यांनी पोलिसावर केल्याने भद्रावती पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र भद्रावती पोलीस आपल्यावर अन्याय करीत असल्याची सबब पुढे करून फिर्यादी संजय सोनवणे हे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देणार असल्याची माहिती समोर येत आहे.