Home वरोरा पूजा फाऊंडेशन तर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती.

पूजा फाऊंडेशन तर्फे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती.

 

स्वच्छ भारत अभियान व विविध उपक्रमाचे आयोजन.

वरोरा प्रतिनिधी :-

स्थानिक शेगाव बु येथून जवळच असलेल्या दादापुर या गावात शिक्षणक्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पूजा फौंडेशन ची स्थापना करण्यात आली व या मार्फत गावात शैक्षणिक जागृती घडवून आणण्यासाठी कोरोनाच्या विविध नियमाचे तंतोतंत पालन करून विविध कार्यक्रम राबवून विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याची उत्कृष्ट कामगिरी तेथील युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल मो नन्नावरे व अमोल ना बोधाने हे युवक करीत आहे याच अनुषंगाने गांधी जयंती निमित्त गावात ग्रामस्वच्छता अभियान राबवून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करून त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगाची त्यांच्या सामाजिक कार्यांची माहिती विध्यार्थ्यांना देण्यात आली यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री, प्रवीण निमजे सर, पूजा फॉउंडेशन चे अध्यक्ष अमोल मोरेश्वर नन्नावरे, उपाध्यक्ष अमोल ना बोधाने, शालेय शिक्षण समिती चे अध्यक्ष सतीश कुंभारे,सदस्य ओमप्रकाश नन्नावरे, प्रवीण नन्नावरे, हजारें सर व विध्यार्थी उपस्थित होते

Previous articleशोकांतिका :- बापू तूम्हचा स्वतंत्र देश पुन्हा गुलाम होतांना तुम्ही ढसाढसा रडत असाल?
Next articleक्राईम स्टोरी :- पानठेला फोडणारा आरोपी सुमित तेलंगला पोलिसांचा अभय का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here