Home चंद्रपूर धक्कादायक :- मेडिकल कॉलेज च्या कामगार वस्तीत भीषण आग.

धक्कादायक :- मेडिकल कॉलेज च्या कामगार वस्तीत भीषण आग.

 

सिलेंडर स्फोटात लाखों रुपयाचे नुकसान आगीच्या कारणांची चौकशी सुरू.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

बल्लारपूर बायपास मार्गावरील पागल बाबानगर येथे मेडिकल कॉलेजचे काम चालू असलेल्या इमारतीच्या कामगार वस्तीत सिलेंडर लीक झाल्यामुळे भीषण आग लागली. ही घटना काल ५ ओक्टोंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान घडली. रात्री ९.३० नंतरही आग आटोक्यात आली नव्हती. आतापर्यंत आठ सिलेंडरचा स्फोट झाले. घटनास्थळी चंद्रपूर अग्निशमन विभागाचे चोरे यांच्यासह फायर कर्मचारी दाखल झाले. अद्याप कोणतीही जिवीतहानी समोर आली नसून आग विझविण्याचा प्रयत्नाला शेवटी रात्री उशिरा यश आले. दरम्यान आग कशी लागली त्यात कोण दोषी आहेत याबद्दल ची चौकशी सुरू झाली असून स्थानिक व्यवस्थापन यासाठी जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here