Home वरोरा प्रहार चे किशोर डुकरे यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झाडांवर चढून वीरुगीरी आंदोलन.

प्रहार चे किशोर डुकरे यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झाडांवर चढून वीरुगीरी आंदोलन.

 

दुसरीकडे वीरुगीरी करणाऱ्या किशोर डुकरे यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक चवरे यांची अश्लील शिवीगाळ?

वरोरा प्रतिनिधी :-

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच सभागृहात आवाज उठविणारे प्रहार संस्थापक बच्चू कडू यांचा वरोरा तालुक्यात वारसा जोपासणारे प्रहार सेवक किशोर डुकरे यांनी अनेकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन तालुक्यात आंदोलन पुकारले आहे. मग शेतकऱ्यांच्या शेत पिकांना हमीभाव मिळत नसेल, त्यांना नुकसान भरपाई मिळत नसेल किंव्हा शासनाने शेतकऱ्यांना देऊ केलेले प्रोत्साहन अनुदान असेल किशोर डुकरे हे आपल्या नेत्यांच्या स्टाईलने आंदोलन करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात.

अशातच तालुक्यात झालेली अतिवृष्टी आणि सोयाबीन कापूस पिकांचे झालेले नुकसान शिवाय महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी दरम्यान रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकर्याना प्रोत्साहन पर 50 हजार रुपए आजपर्यंत मिळाले नसल्याने किशोर डुकरे यांनी वरोरा तहसील कार्यालयातील एका झाडावर चढून वीरुगीरी आंदोलन केले व प्रशासनाचे लक्ष वेधले दरम्यान पोलीस प्रशासनाच्या आग्रहाने व प्रशासनाच्या आश्वासनांनंतर ते खाली उतरले मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना अटक करून पोलीस स्टेशन मधे संध्याकाळ पर्यंत बसून ठेवले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक चवरे यांची अश्लील शिवीगाळ.प्रहारसेवक यांचा संताप 

वीरुगीरी  आंदोलन करणारे किशोर डुकरे यांना वरोरा पोलीस स्टेशन मधे अटक केल्यानंतर पोलीसांनी तुझ्यावर 353 अंतर्गत गुन्हा दाखल होईल अशा प्रकारच्या धमक्या दिल्या, दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक चवरे यांनी “साल्या ह्या मादरचोदामुळे मी दिवसभर उपाशी राहिलो ” अशा प्रकारची शिवीगाळ देऊन माझ्या माणसाचा फोन आला नसता तर बच्चू कडू याच्या फोनवर याला सोडले नसते अशा प्रकारची प्रतिक्रिया देऊन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर एक प्रकारे शाब्दिक हल्ला केला असल्याने वरोरा तालुक्यातील प्रहार सेवक हे संतापले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक चवरे यांच्याविरुद्ध पोलीस महानिरीक्षक व प्रहार संस्थापक बच्चू कडू यांच्याकडे तक्रार देणार असल्याची माहिती आहे.

Previous articleधक्कादायक:- शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापकानी विद्यार्थिनीचा केला विनयभंग.
Next articleधक्कादायक :- मेडिकल कॉलेज च्या कामगार वस्तीत भीषण आग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here