Home चंद्रपूर दुर्दैव :- प्रकाश ठाकरे यांच्या शेतातील उभ्या पिकाच्या सोयाबीनची चोरी करणारे अजूनही...

दुर्दैव :- प्रकाश ठाकरे यांच्या शेतातील उभ्या पिकाच्या सोयाबीनची चोरी करणारे अजूनही मोकाटच ?

 

वरोरा पोलीस स्टेशन मधे तक्रार देऊनही आरोपींवर  गुन्हे दाखल नाही? प्रेस क्लब मधे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांची चिंता.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील खरवड येथील प्रकाश ठाकरे यांच्या शेतातील जवळपास १० एकरांतील सोयाबीनची हार्वेस्टिंग करून सोयाबीन चोरी खुद्द तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गिरडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन केल्याची घटना समोर आल्यानंतर व संबंधित घटनेची वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यानंतर सुद्धा सात दिवस लोटल्यानंतरही वरोरा पोलीसानी आरोपींवर कुठलीही चौकशी करून कारवाई केली नसल्याने प्रकाश ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देऊन माझ्या शेतातील जवळपास ५ लाखाचे सोयाबीन चोरून नेणाऱ्या गुंड प्रव्रुतीच्या लोकांना त्वरित गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी चंद्रपूर येथील प्रेस क्लब येथे दिनांक 21 ओक्टोंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांची उपस्थिती होती.

वरोरा तालुक्यातील खरवड येथील प्रकाश ठाकरे यांच्या सामाईक मालकी व ताब्यातील मौजा खरवड, तह, वरोरा, जि. चंद्रपूर येथील शेत भुमाक. १७१/८, आराजी हे ५-८० हे आर हया वर्णनाची शेतजमीनितील उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाची चोरी तंटामुक्ती अध्यक्ष
लक्ष्मण गिरडकर, किशोर गाठे
प्रफूल गिरडकर, रविंद्र डवरे,सुधीर घामट, नानाजी ढोले, संदीप ऊलमाले यांनी दिनांक १३ ओक्टोंबर ला भरदिवसा शेतात हार्वेस्टिंग करून केली.

सदर शेतजमीन ही प्रकाश ठाकरे व त्यांच्या भावाच्या नावाने रेकॉर्डवर आहे व सदर शेत जमीनी संबंधाने कोर्ट विद्यमान जिल्हा न्यायाधिश – १, वरोरा ह्यांच्या न्यायालयात या प्रकरणी दिनांक ०८/१०/२०२१ रोजी प्रकाश ठाकरे यांच्या बाजूनेच निकाल लागलेला आहे पण तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गिरडकर यांनी किशोर गाठे यांच्या सांगण्यावरून प्रफूल गिरडकर, रविंद्र डवरे,सुधीर घामट, नानाजी ढोले, संदीप ऊलमाले यांच्या मदतीने ठाकरे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची कापणी करून त्या पिकाची चोरी केल्याने प्रकाश ठाकरे यांनी वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार करून आरोपी विरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. परंतु वरोरा पोलीस स्टेशन मधून सदर प्रकरणात कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने शेतकरी प्रकाश ठाकरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देऊन माझ्या जवळपास 5 लाख रुपयाच्या सोयाबीन पिकाची चोरी करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here