बोरी-वडकेश्वर रेती घाटावर रात्रीला झालेल्या कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले.
वरोरा तालूका प्रतिनिधी :-
वरोरा तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे व स्थानिक पोलिस प्रशासनाचा आशीर्वाद यामुळे ते अवैध धंदे करणारे व्यवसायी जणू सैराट झाले होते पण आता सैराट झालेले अवैध व्यवसायी उपविभागीय पोलिस अधिकारी नोपाणी यांच्या रडारवर असून अवैध धंद्यावर अंकुश लावण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
दोन दिवसापूर्वी गोपनीय माहितीच्या आधारे रात्रीला 10.00 च्या सुमारास त्यांनी स्वता बोरी-वडकेश्वर रेती घाटावर धाड टाकून रेतीचा अवैध उपसा होत असताना बोटी, हायवा व प्रोकल्यान जप्त करून ड्रायव्हरला ताब्यात घेतले असल्याने व त्या अवैध रेती व्यवसायात सामील व्यक्तीचा शोध पोलीसानी सुरू केल्याने अवैध रेती व्यावसायिकासह इतर अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले असल्याची जोरदार चर्चा असून उपविभागीय पोलिस अधिकारी नोपानी यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
राजकीय वरदहस्त असल्याने काही रेती माफिया अवैधपणे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वर्धा नदीतून मोठ्या प्रमाणात बोटीच्या साह्याने रेती उपसा करून ती रेती वरोरा व यवतमाळ येथील बाजारात विकत होते.हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता मागील चार महिन्यापूर्वी बोरी गावातील लोकांनी आंदोलन केले होते पण पाऊस असल्याने तात्पुरत्या स्वरूपात ते आंदोलन बंद झाले होते. तसेच याच रेती घाटावर रेती उत्खनन झालेल्या खोल पाण्यात एका गुराख्याचा बुडून मृत्यू सुद्धा झाला होता.मात्र पुन्हा अवैध रेती उत्खनन सुरू होऊन रात्रीच्या वेळी वाहतूक सुरू झाली होती ही बाब नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी आयुश नोपाणी यांच्या लक्षात येताच त्यांनी ही धडक कारवाई केली.उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी यांच्या या धाडसी कारवाईने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
एसडीपीओ नोपाणी यांची दबंग अधिकारी म्हणून होणार महाराष्ट्रात ओळख.
महाराष्ट्राच्या पोलीस विभागात दया नायक, प्रदीप शर्मा, विजय साळसकर, रवींद्र आंग्रे, आणि विश्वास नागरे पाटील व अरुण देवकर इत्यादींची नावे प्रामुख्याने समोर आली आहेत पण आता त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी आयुश नोपाणी यांचा क्रमांक लागला असून एक दबंग आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख निर्माण होत आहे. सद्या वरोरा भद्रावती तालुक्यातील अवैध धंद्यावर त्यांनी अंकुश लावण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला असून राजकीय वरदहस्त असलेल्या अवैध व्यावसायिकांच्या सुद्धा त्यांनी मुसक्या आवळून आपल्या पोलीस विभागातील शपथविधी ला साजेशी कामगिरी चालवली आहे.त्यामुळे वरोरा शहरातील जनता आता त्यांना दबंग पोलीस अधिकारी म्हणून सन्मान देत आहे. त्यांनी वरोरा शहरात रात्री 10 पूर्वी सर्व बाजारपेठ बंद झाली पाहिजे, सर्व पानठेले बंद झाले पाहिजे ह्याकरिता रोज पेट्रोलिंग चालवली आहे, तसेच तालुक्यातील अवैध दारू, सट्टापट्टी व जुगार या अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई सुरू करून व अवैध रेती व्यवसायिकावर कारवाईचा बडगा आणून माफियांवर अंकुश लावला आहे.