Home वरोरा इशारा :- मोटर पंप ची व्यवस्था करून वरोरा शहरातील पाणीपुरवठा तातडीने सुरू...

इशारा :- मोटर पंप ची व्यवस्था करून वरोरा शहरातील पाणीपुरवठा तातडीने सुरू करा.

 

छोटूभाई यांचा मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना आंदोलनाचा इशारा.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहरात मागील काही दिवसापासून. वर्धा नदीवरील मोटर पंप नादुरुस्त असल्याने पिण्याच्या पाणीपुरवठा सुरळीतपणे व पूर्णतया होत नसल्याने शहरातील हजारो नागरिकांमध्ये मोठा असंतोष धगधगत आहे, दरम्यानच्या काळात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाल्याने या समस्येच्या फटका गणपती मोहरम नवरात्र दसरा ईद मध्ये नागरिकांना बसला आहे आणि आता पुढे दिवाळीत सुद्धा बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होऊ नये याची दक्षता नगरपरिषद प्रशासनाने घ्यावी व खालील प्रमाणे उपायोजना करावी त्यासाठी नवीन मोटार पंप खरेदी व दुरुस्ती करून ती 7 दिवसाच्या आत दि.20 सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत माझ्या प्रश्नाच्या उत्तर दिल्याप्रमाणे पाणीपुरवठा नियमित सुरू करण्याची तातडीने कार्यवाही करण्यात यावी अन्यथा जनतेच्या य ज्वलंत प्रश्नाला घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक छोटूभाई शेख यांनी दिला आहे.

वरोरा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वर्धा नदीवरील जॅकवेल वरील 2.मोटार पंप नादुरुस्त असून 1 पंपावर नाही च्या बरोबर पाणीपुरवठा सुरू आहे तो पंप बंद पडल्यास पाणी असताना सुद्धा शहरात नागरिकांना पाण्याची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे व जीवनावश्यक प्रश्न असल्याने इतर कामे मागे ठेवून सदर समस्या 7 दिवसांच्या आत निवारण करा अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी.असा इशारा छोटू भाई यानी नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here