Home क्राईम स्टोरी सनसनीखेज :- चंद्रपूर जिल्ह्यातील त्या सुगंधित तंबाखू व्यापारी गणेश गुप्ताला गोंदिया पोलीसांनी...

सनसनीखेज :- चंद्रपूर जिल्ह्यातील त्या सुगंधित तंबाखू व्यापारी गणेश गुप्ताला गोंदिया पोलीसांनी केली अटक.

 

सुगंधित तंबाखू व ट्रक सहीत 22,41,670/- रुपयाचा मुदेमाल जप्त.

सडक अर्जुनी न्यूज :-

चंद्रपूर जिल्ह्यात सद्ध्या गाजत असलेल्या सुगंधित तंबाखू व्यापारी वसीम वरील पोलिस कारवाई चे पडसाद बघता यामधे सगळ्याना मागे टाकून केवळ एकच मोठा सुगंधित तंबाखू व्यापारी म्हणून ओळख निर्माण करणारा गणेश गुप्ता चंद्रपूर जिल्ह्यात डॉन बनत होता व इतर व्यापाऱ्यांना त्यांनी मागे टाकून सर्वात मोठी बोली लावून सर्वावर त्यांनी मात केली होती तो आज गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन वांगडे यांच्या हाती लागला असून त्याला जवळपास 22 लाखांच्या मुद्देमालसह अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर या संदर्भात बातम्यांची मालिका सुरू आहे.

रायपुर वरुन नवेगावबांध कडे निघालेल्या एका ट्रकमध्ये प्रतिबंधीत असलेला सुंगधी तंबाकुची वाहतुक होत असल्याची माहीती दि. 26/10/2021 रोजी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन वांगडे यांना एका मुखबीर कडुन मिळाली, त्या माहीतीच्या आधारे डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन वांगडे यांनी सहकारी पोलीस अमलंदारा सोबत नवेगाव टी पांईट कोहमारा चौक नाकाबंदी करुन सदर ट्रकची तपासणी सुरु केली असता ट्रक क्र.एम.एच. 40 बि.जी – 3444 त्यामध्ये 1) 27 बॉक्स ज्यामध्ये सुगंधीत तंबाकु (मजा 108) चे 500 ग्रमचे 538 बॉक्स किं. 10,25,670/- 2) 10 प्लास्टिक पोती ज्यामध्ये सुगन्धित तंबाकु (ईगल) चे 400 ग्रॅमचे 400 पॅकेट एकुण कि. 2,16000/- रुपये व ट्रक अंदाजे कि.10,00000/- असा एकुण किंमती 22,41,670/- रुपयाचा मुदेमाल पो.स्टे.ला जमा करुन ट्रकमधील प्रतिबंधीत सुगन्धित तंबाकु बाबत भंडारा येथील अन्न सुरक्षा सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन भंडारा यांना पत्राव्दारे कळविण्यात आले त्यांनी संपुर्ण मालाची तपासणी करुन त्यांचा लेखी अहवाल व रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे आरोपी शाहरुख नासिर खान वय 27 वर्षे रा. नागपुर व गणेश गुप्ता रा.चंद्रपुर यांचे विरुदध अप. क्र. 280 /2021 कलम 188,272,273,328 भादवी सहकलम 3,26 (2)(i), 26 (2) (iv) ,27 (2) (e) ,30 (2) (a), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 यानुसार गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

सदर कारवाई मा.श्री विश्व पानसरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया , मा.श्री अशोक बनकर अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, मा.श्री जालंधर नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सपोनि संजय पांढरे, नापोशि झुमन वाढई, पोशि महेंद्र सोनवाने यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here