Home महाराष्ट्र आता हा प्रश्न फक्त तुम्हीच सोडवू शकता. हवे तर पाया पडतो, पण...

आता हा प्रश्न फक्त तुम्हीच सोडवू शकता. हवे तर पाया पडतो, पण तुम्ही हा प्रश्न सोडवून द्या.

 

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यापुढे एसटी कर्मचाऱ्यांनी केली विनंती.

मुंबई न्यूज ब्यूरो :-

महाराष्ट्रात कुठलाही गंभीर प्रश्न उभा ठाकला तर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या न्यायालयात तो प्रश्न सुटतो हा आजवरचा इतिहास राहिला आहे. मग तो प्रश्न विद्यार्थ्याचा असो, मच्छीमारांचा असो की विविध समुदाय व आता एसटी कर्मचाऱ्यांचा असो, शेवटी राजसाहेब ठाकरे यांच्या मध्यस्थीने व त्यांच्या आक्रमक नेत्रूत्वात तो प्रश्न सुटतो त्यामुळे महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला असताना आंदोलनकर्ते राजसाहेब ठाकरे यांच्या नव्या शिवतिर्थ न्यायालयात पोहचले आणि आपल्या व्यथा मांडल्या.

एकीकडे न्यायलयाची पुढची तारीख आली आणि हाती काही लागले नाही, तर बायकोला काय सांगायचे? या गंभीर संकटात अडकलेले आंदोलनकर्ते मोठ्या विवंचनेत सापडले, त्यामुळे न्यायालयात लवकर तोडगा निघणार नाही आणि आपल्या परिवाराची चिंता वाढेल त्यामुळे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या न्यायालयात लवकर न्याय मिळतो, म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी राजसाहेब ठाकरे यांचे न्यायालय गाठले आणि आता हा प्रश्न फक्त तुम्हीच सोडवू शकता. हवे तर पाया पडतो, पण तुम्ही हा प्रश्न सोडवून द्या.अशी विनंती एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राजसाहेब ठाकरे यांच्याकडे केली, शेवटी मोठ्या दिलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजसाहेब ठाकरे यानी एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या संदर्भात चिंता व्यक्त केली.आत्महत्या करणाऱ्यांचे मी नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा ही माझी अट असेल असे त्यानी शिष्टमंडळाला सांगितले आणि मनसेच्या वकिलांची टीम बोलावून त्याना एसटी कर्मचाऱयांच्या न्यायालयीन लढाईला मजबुती देण्याचे आदेश दिले.दरम्यान राज्य सरकार सोबत मी अगोदर चर्चा करतो आणि मग यावर काय करायचे तो निर्णय घेऊ असे पत्रकारांशी बोलताना माणसे नेते बाळा नांदगावकर यानी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळन्याच्या अवस्थेत असताना परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्यामुळे ‘ना काम, ना दाम’ यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळू नये, यासाठी पुढाकार घेत संप मागे घेण्याचे आवाहन निवेदनाद्वारे केले आहे. पण काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची या साऱ्या गोंधळादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका प्रतिनिधी मंडळाने मुंबईमधील निवासस्थानी भेट घेतली. राजसाहेब ठाकरे यांनी यावेळी भेटीच्या सुरुवातीलाच आत्महत्या न करण्याची अट कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसमोर ठेवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here