Home लक्षवेधी खळबळजनक :-एकाच दिवशी दोन १६ वर्षीय मुलींची आत्महत्या?

खळबळजनक :-एकाच दिवशी दोन १६ वर्षीय मुलींची आत्महत्या?

 

एकीने गळफास लावला तर दुसरीने विहिरीत उडी घेऊन संपवली जीवनयात्रा.

न्यूज नेटवर्क ;-

सध्याच्या परिस्थितीत मुलामुलींची मानसिक स्थिती ढासळली असून एणकेण प्रकारे मानसिक तणावातून स्वताचे जीवन संपविण्याचा जणू ट्रेंड सुरू झाला की काय? असेच चित्र दिसायला लागले आहे. अशाच प्रकारची घटना बीड जिल्ह्यात घडली असून दोन 16 वर्षीय अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

एकाच दिवशी दोन मुलींनी आत्महत्या केल्यामुळे बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. एकीने गळफास तर दुसऱ्या मुलीने विहिरीत उडी मारून आपली जीवनयांत्रा संपवली.बीड जिल्ह्यातील नेकनूर आणि केज तालुक्यात या दोन्ही आत्महत्याच्या घटना घडल्या आहे. नेकनूरमध्ये एकीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर केज तालुक्यातील मस्साजोग येथे दुसऱ्या मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. पाली रमेश मुळे (16) रा. नेकनूर आणि कोमल गोविंद गायकवाड (16) रा.मस्साजोग अशी आत्महत्या केलेल्या दोन मुलींची नावे आहेत. कोमल गायकवाड या मुलीने घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली. घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या दोन्ही मुलींनी आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी नेकनूर व केज पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here