Home महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राजसाहेब ठाकरे यांनी मांडल्या शरद पवारांच्या दरबारात.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राजसाहेब ठाकरे यांनी मांडल्या शरद पवारांच्या दरबारात.

 

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण आणि सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी हे प्रमुख मुद्दे.

मुंबई न्यूज नेटवर्क :-

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले असताना शेवटचा पर्याय म्हणून एसटी कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना भेटले. आजवर राज्यातील अनेक समस्यांचे समाधान राजसाहेब ठाकरे यांच्या न्यायालयात झाले आणि अनेकदा त्यानंतर राजसाहेब ठाकरे यांच्या घरासमोर न्याय मिळालेल्या लोकानी जल्लोष केल्याचे चित्र सर्वानी बघितले आहे.दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचे जे मुद्दे आहे की एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे व सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी. त्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकर मिटावा आणि कामगारांच्या वेतनविषयक मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघावा यासाठी ही भेट होती. सुमारे तासभर झालेल्या चर्चेत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण आणि सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी हे प्रमुख मुद्दे होते.

याप्रसंगी पक्षाचे नेते श्री. बाळा नांदगावकर, श्री. नितीन सरदेसाई, सरचिटणीस श्री. कीर्तिकुमार शिंदे, सचिव श्री. हर्षल देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे कार्याध्यक्ष श्री. विलास अकलेकर, सरचिटणीस श्री. मोहन चावरे उपस्थिउपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here