Home मुंबई आरपार :- बोलघेवड्या रावसाहेब दानवे यांनी भाजप-मनसे युतीबाबत फालतू वक्तव्य करू नये

आरपार :- बोलघेवड्या रावसाहेब दानवे यांनी भाजप-मनसे युतीबाबत फालतू वक्तव्य करू नये

 

पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार, उगाच 105 आमदारांची धमक दाखवू नये. महाराष्ट्र सैनिक आक्रमक.

मुंबई न्यूज नेटवर्क:-

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोपर्यंत परप्रांतीयांच्या मुद्द्याबाबत आपले विचार बदलणार नाही, तोपर्यंत मनसे-भाजप युती होऊच शकत नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले ते मनसेला डिचविनारे वक्तव्य असून ज्याअर्थी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी युतीबाबत भाजप कडे कुठला प्रस्ताव ठेवला नाही किव्हा कुठली चर्चा भाजप मनसे नेत्यांमध्ये झाली नाही तर रावसाहेब दानवे यांना कुठला अधिकार आहे की मनसे सोबत युती तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत परप्रांतीयांचा मुद्दा सोडणार नाही आणि विशेष म्हणजे भाजप मनसे युती होण्याचे व न होण्याचे अधिकार रावसाहेब दानवे यांना दिले कुणी? ते कुठल्या अधिकाराने बोलतात हे पण तपासण्याची आवशकता आज निर्माण झाली आहे, कारण भाजपचा कुठलाही नेता ऊठसूट मनसे सोबत युती बाबत उलटसुलट विधाने करतात जे कुठल्याही तर्काला धरून नसते व त्यांच्या विधानाची केवळ बातमी बनते पण त्यामुळे भाजप मनसे युतीबाबत कुठलाही निर्णय होत नाही त्यामुळे बोलघेवड्या रावसाहेब दानवे यांनी भाजप मनसे युती बाबत फालतू वक्तव्य करू नये अशा प्रकारचा इशारा महाराष्ट्र सैनिकांनी दिला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी चे सरकार आहे व 105 आमदार असलेला प्रमुख विरोध पक्ष म्हणून भाजपचे स्थान आहे. पण आजही महाराष्ट्रात प्रमुख विरोध पक्षाची भूमिका राजसाहेब ठाकरे यांच्या नेत्रूत्वात एक आमदार असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच दाखवत आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. भाजप नेते फक्त प्रसारमाध्यमांमधे उलटसुलट प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात तर मनसे कडे एक आमदार असताना राज्यात ज्या प्रकारे मनसेची आंदोलने होत आहे व या आघाडी सरकारला धारेवर धरल्या जात आहे, तेवढी आक्रमकता भाजप च्या नेत्यांमध्ये नाही व पैशांनी निवडणुका जिंकायची क्षमता असली तर लोकांच्या मनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच जिंकत आली आहे. कारण मनसे मधे कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या दिल्या जातात तर भाजप मधे कोट्याधीश व श्रीमंतांना उमेदवाऱ्या दिल्या जातात त्यामुळे पैशाचा खेळ करून भाजप उमेदवार निवडून येतात तर मनसेचा उमेदवार हा पैशाची कमतरता असल्याने हरतो कारण मतदारांना निवडणुकीच्या वेळेस पक्ष चालत नाही,चांगला माणूस चालत नाही तर त्यांना पैशा हवा असतो पण जर राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांना पक्षनिधी देण्याचे ठरवले तर त्या दिवशी महाराष्ट्रात मनसेची सत्ता सुद्धा येऊ शकते हे भाजपवाल्यांनी लक्षात घ्यावं. मनसे सोबत युती करायची की नाही करायची हे ठरविण्याचे अधिकार भाजप नेत्यापेक्षा मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे आहे कारण मनसेला महाराष्ट्रात सत्ता आली किव्हा नाही आली याचे फरक पडत नाही, कारण मनसेची सत्ता ही रस्त्यावर आहे, पण भाजपला मात्र मनसेशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही हे भाजप नेत्यानी लक्षात घ्यावे व त्यानंतरच भाजप मनसेच्या युती बाबत वक्तव्य करावे असे आव्हान महाराष्ट्र सैनिकांनी भाजप नेताना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here