Home गडचिरोली ब्रेकिंग :- भीमा कोरेगाव दंगलीचा आरोपी मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान.

ब्रेकिंग :- भीमा कोरेगाव दंगलीचा आरोपी मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान.

 

गडचिरोली जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी पोलिस कारवाई.नक्षल चळवळीला ब्रेक.

गडचिरोली प्रतिनिधी :-

भीमा कोरेगाव दंगली चा आरोपी मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीसानी कंठस्नान दिल्याचा थरार घडला असून यामधे ज्यांच्यावर 50 लाखांचे बक्षीस होते त्या मिलिंद तेलतुंबडे यांच्या सोबतच नक्षलवादी चळवळीत सामील जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम या नक्षली कमांडर यांचा पण खात्मा काल पोलिसांच्या कारवाईमध्ये झाला आहे. हे चौघेही नक्षल चळवळीचे आधारस्तंभ होतेअसे बोलल्या जात होते.

गडचिरोलीमधील छत्तीसगडच्या सीमेवर काल सकाळपासूनच चकमकीला सुरुवात झाली होती. या चकमकीमध्ये पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरून नक्षलवाद्यांचे शिबिर उद्ध्वस्त केले. यावेळी झालेल्या गोळीबारात तब्बल २६ नक्षलवादी ठार झाले. तर सुरक्षा दलांचे चार जवान जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठार झालेल्या २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आज दुपारी मृतदेह आल्यानंतर व ओळख परेड झाल्यानंतरच नक्षलवाद्यांचा आकडा समोर येणार असून याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल, असे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरदिनटोला जंगलात सकाळपासून ही चकमक सुरू होती. सकाळी पाच मृतदेह सापडले होते. अजुनही चकमक सुरू आहे. घनदाट जंगल असल्याने सॅटेलाईट फोनवरुन पोलीस मुख्यालय संपर्क करत आहे. मृतक माओवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कसनासुर बोरीयाच्या चकमकीत 2018 मध्ये 38 माओवादी ठार झाले होते. त्यानंतरची मोठी कारवाई आहे. गेल्या वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here