Home वरोरा लय भारी :- अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे आनंद गेडाम यांची दमदार...

लय भारी :- अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे आनंद गेडाम यांची दमदार कामगिरी.

 

क्रांतीसूर्य बिरसामुंडा यांच्या जयंती प्रित्यर्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन.

वरोरा प्रतिनिधी :-

सामाजिक चळवळी ह्या केवळ राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधल्या गेल्याने प्रत्त्येक समाजाच्या संघटना आता निवडणुकीत पैसे कमविण्यासाठी असतात असा समज झालेला आहे,मात्र अशाही विपरीत परिस्थितीत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते आनंद गेडाम यांनी आपल्या आदिवासी समाजाला एकत्र जोडून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी समाजाचे थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती चा कार्यक्रम आयोजित करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती सर्वत्र साजरी होत असताना वरोरा सारख्या शहरात प्रथमच एका युवकाने ही जयंती स्वताच्या ताकतीने साजरी करण्याचे धाडस केले आणि विविध राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यां या कार्यक्रमात निमंत्रित करून समाजाला त्या सर्वांचा कसा सहयोग मिळेल याचा मेळ त्यांनी घडवून आणला.दरम्यान या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्य होणाऱ्या कार्यक्रमाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत असले तरी आनंद गेडाम यांनी आपल्या कार्यकर्त्याना घेऊन ही जयंती साजरी करण्याची दमदार कामगिरी त्यांनी केली असल्याने समाजात त्यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

दिनांक 14,15 नोव्हेंबर या दोन दिवशीय कार्यक्रमात रैली समाज प्रबोधन व किर्तनाचा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमात सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक आनंद गेडाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here