Home वरोरा पंचनामा :- श्री सिद्धिविनायक ना.स. पतसंस्थेच्या संचालकांवर गुंतवणूकदार सरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे...

पंचनामा :- श्री सिद्धिविनायक ना.स. पतसंस्थेच्या संचालकांवर गुंतवणूकदार सरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करा?

 

जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अँड अमोल बावणे यांनी केली मागणी.संचालकांमधे उडाली खळबळ?

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा येथील नेहरू चौक परिसरात मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेमधे कोट्यावधी रुपयाची अफरातफर झाली असून शेकडो गुंतवणूकदारांचे ठरलेल्या मुदतीत पैसे परत केले नसल्याने त्या संचालकांवर गुंतवणूकदार सरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी ग्राहक सरक्षण संस्थेचे विदर्भ अध्यक्ष अँड अमोल बावणे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे आता वरोरा तालुक्यातील पतसंस्थेच्या गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या असून तालुक्यातील सर्व गुंतवणूकदार एकत्र आल्यास पतसंस्थेत कोट्यावधी रुपयाची झालेली अफरातफर आता संचालकांना न्यायालयात भरून देण्याची वेळ येणार आहे.

श्री सिद्धिविनायक ननागरी सहकारी पतसंस्थेत संचालकांवर वरोरा शहर व तालुक्यातील शेकडो गुंतवणूकदारांच्या दैनंदिन,आठवडी,मासिक यासह फिक्स डिपॉझिट केलेले आहे. पण ठरलेल्या मुदतीत पैसे परत करण्याची जेंव्हा वेळ आली तेंव्हा संस्थेच्या अध्यक्ष सचिव व इतर संचालकांनी हात वर केल्याने गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला त्यामुळे काही गुंतवणूकदार हे ग्राहक सरक्षण संस्थेचे विदर्भ अध्यक्ष अँड अमोल बावणे यांच्याकडे मदत मागायला गेले असता त्यांनी तहसीलदार तालुका सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची कार्यवाही करावी अशी विनंती केली होती, परंतु मागील महिन्याभरात प्रशासनाने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची कुठलीही कार्यवाही केली नसल्याने आता गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अँड अमोल बावणे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर गुंतवणूकदार सरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे.

श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेमधे शहरातील नामी संचालक असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास काहीही अडचण नाही पण ते पैसे परत करायचे कसे? हा त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न आहे त्यामुळे आता वेळेत संचालकांनी गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये परत केले नाही तर गुंतवणूकदार सरक्षण अधिनियम अंतर्गत अंतर्गत संचालकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने संचालकांमधे मोठी खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here