Home वरोरा जयंती विशेष :- उदयपाल महाराज यांच्या प्रभोधनात्मक कार्यक्रमांने भगवान बिरसामुंडा जयंती थाटात...

जयंती विशेष :- उदयपाल महाराज यांच्या प्रभोधनात्मक कार्यक्रमांने भगवान बिरसामुंडा जयंती थाटात साजरी.

 

आनंद गेडाम यांच्या नेत्रूत्वात झालेल्या या कार्यक्रमात समाजबांधव आले एकत्र.

वरोरा प्रतिनिधी :-

स्वातंत्र्य भारताच्या लढ्यात स्थानिक भुमीपुत्राच्या हक्कासाठी अवघ्या 25 वर्षाच्या जीवनात इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आदिवासी समाजाचे दैवत भगवान बिरसामुंडा यांची जयंती आनंद गेडाम यांच्या नेत्रूत्वात उदयपाल महाराज यांच्या प्रभोधनात्मक कार्यक्रमांने थाटात साजरी करण्यात आली. पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम होणार की नाही या द्विधा मनस्थितीत समाजाचे नेते रमेश मेश्राम, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम व नगरसेवक छोटूभाऊ शेख यांच्या पुढाकाराने हा जयंतीचा कार्यक्रम अखेर साजरा करण्यात आला आणि आदिवासी बांधवांना या कार्यक्रमाचा लाभ घेता आला.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महानायक बिरसामुंडा यांनी सन 1886 पासून इंग्रजांच्या दडपशाही विरोधात आपली लढाई लढली आणि आदिवासी समाजाचे धर्मांतर करून त्यांना ख्रीच्चन बनविण्याचा इंग्रजांचा डाव हाणून पाडला.१८५७ च्या उठावानंतर सुरू झालेल्या इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधातील आंदोलनाला भगवान बिरसामुंडा यांनी त्यांच्या काळात चोख प्रत्युत्तर देत वयाच्या पंचविसीत इंग्रज सत्तेशी सहस्ञ लढा उभारुन अफाट इंग्रज सैनिकांना जर्जर करुन सोडले आणि शोषित पिडीत आदिवासी जनतेला स्वतःच्या नेत्रूत्वात इंग्रजांशी लढण्याचे बळ दिले.अशा महामानव जननायक क्रांतीविर भगवान बिरसामुंडा यांची १४६ वी जयंती वरोरा तालुक्यात आंबेडकर चौक वरोरा येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

या जयंती निमीत्ताने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन घोषणा देण्यात आल्या व मान्यवरांच्या हस्ते सर्व महापुरूषाना माल्यार्पण करुन व दिपप्रज्वलीत करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गजाननराव मेश्राम तर कार्यक्रमाचे उद्घाटक आदिवासी सगा समाज वरोराचे अध्यक्ष रमेश मेश्राम हे होते.प्रमुख अतिथी म्हणुन चिंतामण आञाम सदस्य पं.स.भद्रावती. छोटुभाई शेख नगरसेवक, न.प.वरोरा.महीपाल मडावी राजुरा. मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. आदिवासी विकास परिषद वरोराचे अध्यक्ष शरद मडावी. अॅड.रोशन नखवे कार्यकर्ता इत्यादीची मंचावर उपस्थित होती.

या प्रसंगी आदिवासी समाजाचे नेते व कार्यक्रमाचे उद्घाटक रमेश मेश्राम यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.ते म्हणाले बिरसामुंडा शिकले म्हणुन स्वातंञ्याची लढाई लढले.बिरसाचा क्रांतीकारी विचार आणी कृत्तीशिल कार्य पुढे न्यायचे असेल तर बुध्दीजीवी वर्गानी पुढे येवुन कार्य केले पाहीजेत. समाजाचे दिशादर्शक बनले पाहीजेत. समाजावर होणारा अन्यायाच्या विरोधात उभे राहुन समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत.
या कार्यक्रमाचे प्रसंगी गजाननराव मेश्राम नगरसेवक नगरपरिषद वरोरा यांनी आपल्या भाषणात म्हणाले, क्रांतीसुर्य बिरसामुंडानी स्वातञ्याचा लढा लढुन आदिवासी समाजाला धर्माचे तत्वज्ञान दिले. कोणीही कोणावर अन्याय करु नका.सर्वाशी समतेने वागा.चोरी करु नका.खोटे बोलू नका.भिक मागु नका.अंधविश्वास पाळु नका.दगड धोंडयाची पुजा करुन नका.स्वाभिमानाने जगा.दारु व मादक पदार्थांचे सेवन करु नका. प्राणी, पक्षी, वृक्षवल्ली व जीवजंतु यांच्यावर प्रेम करा निसर्ग विज्ञानाने वागा.मातृभूमीवर प्रेम करा. जीवनाचे खरे सत्य बिरसाने आदिवासी लोकाना कित्येक वर्षां पुर्वी सांगितले.ते सत्य जीवनात उतरवून आदिवासी समाज जगण्याचा प्रयत्न करतो आहे.असे सखोल मार्गदर्शन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.गणपत येटे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुञसंचालन सुरेश मडावी सर यांनी केले. आभार प्रदर्शन आनंद गेडाम यांनी केले.

शेवटी ८.००वाजता क्रांतीविर भगवान बिरसामुंडा यांचे जीवन चरिञावर आधारीत‌ मा.उदयपाल महाराज यांचे प्रभोधनात्मक जाहीर किर्तनाचा कार्यक्रम झाला.कार्यक्रम ऐकण्याकरीता मोठ्या प्रमाणात आदिवासी जन समुदाय उपस्थित होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक मंडळ,आनद गेडाम व त्यांची टिम इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here