Home वरोरा दणका :- अखेर श्री सिद्धिविनायक ना.स. पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती. ग्राहकांच्या ठिय्या आंदोलनाला...

दणका :- अखेर श्री सिद्धिविनायक ना.स. पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती. ग्राहकांच्या ठिय्या आंदोलनाला यश.

 

गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू, संस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल होणार.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा येथील नेहरू चौक परिसरात मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेमधे कोट्यावधी रुपयाची अफरातफर झाली असून शेकडो गुंतवणूकदारांचे ठरलेल्या मुदतीत पैसे परत केले नसल्याने त्या संचालकांवर गुंतवणूकदार सरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी ग्राहक सरक्षण संस्थेचे विदर्भ अध्यक्ष अँड अमोल बावणे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केल्यानंतर या संस्थेतील गुंतवणूकदारानी तालुका सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.त्या आंदोलनाचे नेत्रूत्व अँड अमोल बावणे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केले दरम्यान जिल्हा उपनिबंधक यांनी तात्काळ वरोरा येथील ठिय्या आंदोलनाला भेट देऊन ग्राहकांच्या मागण्या आपण लवकर सोडवू व दोषी संचालकांवर गुन्हे दाखल करू असे आश्वासन दिले व  संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती केली त्यामुळे आता गुंतवणूकदार ग्राहकांचे पैसे परत मिळण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

श्री सिद्धिविनायक ननागरी सहकारी पतसंस्थेत संचालकांवर वरोरा शहर व तालुक्यातील शेकडो गुंतवणूकदारांच्या दैनंदिन,आठवडी,मासिक यासह फिक्स डिपॉझिट केलेले आहे. पण ठरलेल्या मुदतीत पैसे परत करण्याची जेंव्हा वेळ आली तेंव्हा संस्थेच्या अध्यक्ष सचिव व इतर संचालकांनी हात वर केल्याने गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला त्यामुळे काही गुंतवणूकदार हे ग्राहक सरक्षण संस्थेचे विदर्भ अध्यक्ष अँड अमोल बावणे यांच्याकडे मदत मागायला गेले असता त्यांनी तहसीलदार तालुका सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची कार्यवाही करावी अशी विनंती केली होती, परंतु मागील महिन्याभरात प्रशासनाने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची कुठलीही कार्यवाही केली नसल्याने आता गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अँड अमोल बावणे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर गुंतवणूकदार सरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी केली होती व गुंतवणूकदार यांनी त्यांच्या नेत्रूत्वात वरोरा तालुका सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. शेवटी आंदोलन चिघळत असल्याचे बघून स्वता जिल्हा उपनिबंधक यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून गुंतवणूकदार यांची बाजू ऐकून घेऊन श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या कामकाजाची चौकशी करून गुंतवणूकदार यांना पैसे परत मिळवून देण्याची हमी दिली त्यानंतर ठिय्या आंदोलन परत घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here