मनसे नेते, सरचिटणीस आणि राज्य उपाध्यक्ष व अंगिक्रुत संघटनेचे राज्य पदाधिकारी यांची राहणार उपस्थिती.
मुंबई न्यूज नेटवर्क :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या नव्या शिवतिर्थ या घरातील कार्यालयात मनसे नेते,सरचिटणीस राज्य उपाध्यक्ष व इतर अंगीक्रुत संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांची उद्या दुपारी तातडीची बैठक बोलवल्याने आता त्या बैठकीत काय आदेश राजसाहेब ठाकरे यांच्याकडून होणार याकडे महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्र सैनिकांचे लक्ष लागले आहे.
मागील अनेक महिन्यापासून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे पुणे व नाशिक दौरे सुरू होते मात्र दरम्यानच्या काळात त्यांना कोरोना ची लागण झाल्याने मागील एक महिन्यापासून ते घरीच होते. मात्र तरीही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने त्यांच्या शिष्टमंडळांनी राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन हा चिघळलैला प्रश्न तुम्हीच सोडवू शकता अशी मागणी वजा विनंती केली होती त्यामुळे तो प्रश्न घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यासाठी तर ही तातडीची बैठक बोलावली नसेल ना? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
उद्याच्या या बैठकीत मनसे चे विदर्भाचे नेते तथा सरचिटणीस हेमंत गडकरी, राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले हे मुख्यत ह्या बैठकीला जाणार असल्याची सुत्राची माहिती आहे.