Home धक्कादायक धक्कादायक :- एका २३ वर्षीय तरुणीने १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर केला लैंगिक...

धक्कादायक :- एका २३ वर्षीय तरुणीने १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर केला लैंगिक अत्याचार?

 

सोबतच तरुणीच्या प्रियकराने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार. तरुण तरुणी पोलिसांच्या जाळ्यात?
वेब न्यूज :-

मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये महिलांवर आणि अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना सतत घडत आहेत. अशातच आता ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी विकृत घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कल्याण- पूर्व भागात एका तरुणीने चक्क एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी तरुणी एवढ्यावरच न थांबता तिने तर चक्क पीडित मुलाच्या अल्पवयीन बहिणीवर प्रियकराद्वारे बलात्कार करण्यास भाग पाडले आहे.

हा प्रकार कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडला असून येथील एका २३ वर्षीय तरुणीने १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला दरम्यान ही विकृत तरुणी पीडित अल्पवयीन मुलाची नातेवाईक आहे.

मागील काही महिन्यांपासून ही तरुणी पीडित अल्पवयीन मुलाचे जबरदस्तीने लैंगिक शोषण करत होती. तसेच घटनेची वाच्यता न करण्यासाठी आरोपी तरुणी अल्पवयीन पीडित मुलाला नेहमी धमकावत असत. म्हणूनच मागील काही महिन्यांपासून पीडित मुलाने या घटनेची वाच्यता कुठे देखील केली नाही.

आरोपी तरुणी एवढ्यावरच न थांबता,तिने चक्क आपल्या प्रियकराकडून पीडित अल्पवयीन मुलाच्या १६ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर देखील लैंगिक अत्याचार करायला भाग पाडली आहे. या विकृत तरुणीच्या प्रियकराने देखील पीडित अल्पवयीन मुलीवर सतत लैंगिक अत्याचार केले आहे. या घटनेची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत, अशी धमकी पीडित अल्पवयीन बहीण- भावाला दिली जात होती. यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर येत नव्हता.

अखेर भेदरलेल्या आणि आरोपींच्या अत्याचाराच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित अल्पवयीन भाऊ- बहिणीने मोठ्या हिंमतीने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी कुटुंबीयांना सांगितली आहे. यानंतर नातेवाईकांनी कल्याण पूर्वेमधील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या घटनेविषयी फिर्याद दिली आहे. अल्पवयीन भाऊ- बहिणीवर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी एकून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी विकृत तरुण- तरुणी विरोधामध्ये कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here