Home चंद्रपूर विशेष वार्ता :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या चंद्रपूर शाखेतर्फे संविधान दिन साजरा.

विशेष वार्ता :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या चंद्रपूर शाखेतर्फे संविधान दिन साजरा.

 

संविधानाच्या माध्यमातून जनतेला त्यांचे हक्क अधिकार मिळणे झाले कठीण,उपस्थितांनी व्यक्त केली खंत.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

भारतात लोकशाही आहे आणि संविधानाच्या माध्यमातून देशाचा कारभार चालवला जातो, मात्र संविधानाने जे हक्क अधिकार जनतेला दिले ते हक्क अधिकार शासनकर्त्याकडून हिरावले जात असल्याने जनतेला सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध आपल्या हक्कासाठी दिल्लीतील आंदोलना सारखे असंख्य आंदोलने करावे लागत आहे प्रसंगी त्या आंदोलनात आपले प्राण अर्पण करावे लागत आहे जी लोकशाहीची विटंबना आहे.त्यामुळे खरी लोकशाही टिकविता यावी यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला जातो व या देशात संविधानाने राज्य चालवल्या जाते याची जाणीव राज्यकर्त्याना करून दिली जाते.

देशात ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी महासंघ लढत आहे, त्या संविधान दिनाचे औचित्य साधुन काल दि. २६ नोव्हेंबर २०२१ ला जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी संविधानांच्या उदेशिकेचे वाचन करण्यात आले. ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. नितीन कुकडे यानी संविधानदिनी असे म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानामुळे या देशातील सर्व नागरिकांना सामाजीक, आर्थिक, राजकीय, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, व उपसना यांचे स्वातंत्र, दर्जाची व संधिची समानता, दिली गेली आहे. तसेच व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता टिकविण्यासाठी बंधुता हा फार मोठा विचार डॉ. बाबासाहेब यानी मांडलेला आहे. त्यामुळेच आपला देश प्रगतीपथावर आहे.

याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक, डॉ. अशोक जिवतोडे, जिल्हा सचिव विजय मालेकर, यानी संविधानाविषयी मनोगत व्यक्त केले तसेच डॉ. चटप, शरद कुत्तरमारे, रवि जोगी, प्रशांत चहारे, संजय वाघमारे, सजय रगारी, किशोर धनविजय पाटिल, शितल पाटील, शारदा नवघरे, मंजुषा डुडुरे, ज्योत्सना लालसरे, गेडाम, चामाटे, मोडक, पिंपळकर, थेटे, वासेकर, खोके, गाडगे, राहुल देशमुख, मनिष यादव, सोनी, अमित अत्तरकर, सुनिल मुसळे व इतर अनेक मान्यवर उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here