Home वरोरा धक्कादायक :- वरोरा येथील भारतरत्न मौलाना अबुलकलाम आझाद चौक झाला गायब?

धक्कादायक :- वरोरा येथील भारतरत्न मौलाना अबुलकलाम आझाद चौक झाला गायब?

 

मराठी मुस्लिम सोशल वेल्फेअर वरोरा पदाधिकारी यांची कारवाईची मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहरात नेमके काय चाललेय हेच मुळात कळायला मार्ग नसून अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या शहरात सामाजिक ऐकोपा सुद्धा जणू संपलाय की काय? असा प्रश्न उभा ठाकला आहे. कारण ज्या चौकाला दिनांक २६ जानेवारी २०१९ ला भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद चौक असे फलक नगर परिषद वरोरा व्दारे ठराव मंजूर करून लावण्यात आले त्या चौकातील फलक कुणीतरी अज्ञात इसमाने गायब करून तो चौकाच गायब करण्याचा गुन्हा केला आहे दरम्यान मराठी मुस्लिम सोशल वेल्फेअर वरोरा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन तो चौकातील फलक गायब करणाऱ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करून विधीवत तो फलक लावण्याची मागणी केली आहे.

चौकाला भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद चौक असे नामकरण करणारा फलक विद्यमान नगराध्यक्ष अहेतेशाम अली व इतर त्यांच्या सहकारी सभापती नगरसेवक यांनी वार्डातिल नगरसेवक व आझाद वार्डाचे नागरीकांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण केले होते. परंतू काही दिवसांपूर्वी काही समाज कंटकाकडून या फलकाची तोडफोड करून फलक काढण्यात आले आहे. व कायद्याचे उलंघन करून त्या समोर महर्षी वाल्मीकी ऋषी चौक असे फलक लावण्यात आलेले आहेत.

सामाजिक ऐकोपा जपणाऱ्या वरोरा शहरात यामुळे असामाजिक तत्वाच्या या कृत्याने शहरातील शांतता सुव्यवस्था बिघडून सामाजिक धार्मिक आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे वेळीच अशा समाजकंटकावर कारवाई करावी अशी मागणी मराठी मुस्लिम सोशल वेल्फेअर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्यासह पोलिस स्टेशन व इतर अधिकारी यांच्याकडे केली आहे.निवेदन देताना संघटनेचे मोहसीन सैय्यद,मुज़म्मील शेख, सैय्यद नजमुलहूदा, शोयब शेख,कादर शेख, समीर शेख, अबरार शेख,मुबश्शीर अली इत्यादींची उपस्थिती होती.

Previous articleविशेष वार्ता :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या चंद्रपूर शाखेतर्फे संविधान दिन साजरा.
Next articleग्रेट :- संविधान दिनाचे औचित्य साधून मनसे जनहित विधी विभागातर्फे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना संविधान प्रस्तावना फोटो भेट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here