चद्रपूर मनसे जनहित व विधी विभागाचे राजू बघेल यांच्या नेत्रूत्वात अनोखा उपक्रम.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
काल झालेल्या २६ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या संविधान दिनाचे औचित्य साधून जनहित कक्ष व विधी विभागाचे अध्यक्ष ऍड. श्री. किशोर शिंदे यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्याचे जनहित विधी विभाग जिल्हा अध्यक्ष राजू बघेल यांच्या नेत्रूत्वात चंद्रपूर शहरातील वरिष्ठ शासकीय, वैद्यकीय तसेच पोलीस अधिकाऱ्यांना जनहित कक्ष व विधी विभागाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संविधान प्रस्तावानेच्या फ्रेम्स भेट देऊन संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
भारतात संविधानाने राज्य चालविले जाते पण संविधानाचे पालन करणारे फार कमी अधिकारी असतात त्यामुळे संविधान दिनाच्या दिवशी त्या अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य निभावण्याची जाणीव तयार व्हावी या उदात्य हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित विधी विभागातर्फे महाराष्ट्रात सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना संविधान प्रस्तावनेच्या फ्रेम भेट देऊन जनतेला हक्क अधिकार मिळवून देणाऱ्या संविधानानुसार आपण प्रामाणिक कार्य करावे अशी अपेक्षा मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण जनहित विधी विभागाचे जिल्हा अध्यक्ष राजू बघेल जिल्हा उपाध्यक्ष रमेश काळबांदे,जिल्हा उपाध्यक्ष सुनील गुडे,शहर अध्यक्ष विजय तूरक्याल. वाहतूक सेना शहर अध्यक्ष असलम खान अँड आनंद वाकडे यांची उपस्थिती होती.