Home Breaking News खळबळजनक :- शिवसेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, घरात घुसून चाकुने केले सपासप वार,

खळबळजनक :- शिवसेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, घरात घुसून चाकुने केले सपासप वार,

 

भाजप पदाधिकाऱ्यांच्या हत्तेनतर भंडाऱ्यात एका शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ.

न्यूज नेटवर्क :-

काही दिवसापूर्वी एका भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येने अवघ्या नाशकात खळबळ उडाली होती. दरम्यान नाशिकमधील भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या झाल्यानंतर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनही केलं आहे. ही संतापजनक घटना ताजी असताना आता भंडाऱ्यात एका शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

हत्त्या झाली त्या शिवसेना पदाधिकारी यांचे नाव दिनेश बांते असे असून ते भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला गावातील उपसरपंच देखील आहे. आधीच राज्यात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या होणाऱ्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापत असताना, यामध्ये आणखी एक भर पडली आहे. दवडीपार बेला गावातील उपसरपंच दिनेश बांते यांची काल रात्री दहाच्या सुमारास घरात घुसून हत्या करण्यात आली आहे.

बांते यांच्या घरात घुसून आरोपींनी धारदार चाकुने त्यांच्यावर सपासप वार केले होते तर बांते घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर, मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने बांते यांना रुग्ण वाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. येथे गेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिनेश बांते यांना मृत घोषित केलं आहे.

या घटनेची माहिती भंडारा शहर पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. घराशेजारी राहणाऱ्या लोकांसोबत असलेल्या जुन्या भांडणातून सूड उगवण्यासाठी ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास भंडारा शहर पोलीस करत आहेत. मृत दिनेश बांते हे शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि दवडीपार बेला गावचे उपसरपंच होते. बांते यांच्या हत्येनं गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Previous articleग्रेट :- संविधान दिनाचे औचित्य साधून मनसे जनहित विधी विभागातर्फे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना संविधान प्रस्तावना फोटो भेट.
Next articleअभिनव उपक्रम :- न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल डिजिटल मीडिया असोसिएशनकडून स्पर्धेचे आयोजन !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here