जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्यानंतर सुद्धा कंपन्या का दर घटवत नाही ? याचे आश्चर्य ..
न्यूज नेटवर्क :-
जागतिक स्तरावर कौरौनाचा नवा व्हेरीअंट जगात पसरल्याच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट होत असल्याच्या बातम्या आहे मात्र देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीं मागील 28 दिवसापासून स्थिर असल्याने तेल कंपन्या ग्राहकांची मोठी आर्थिक लूट करत असल्याचे चित्र दिसत आहे.दरम्यान देशभरातील सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असतानाच राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलच्या किमती थेट ८ रुपये प्रतिलिटर एवढ्या कमी झाल्यामुळे देशभरातील नागरिकांना जरी पेट्रोलच्या शंभरीपार गेलेल्या दरांचा फटका सहन करावा लागत असला, तरी दिल्लीकर मात्र दिल्ली सरकारच्या एका निर्णयामुळे आनंद झाला असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता इतर राज्यातील जनता देखील त्या त्या राज्य सरकारने अशाच प्रकारचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल १०३.९७ रुपये प्रतिलिटर, तर डिझेल ८६.६७ रुपये प्रतिलिटर एवढ्या दराने विकले जात आहे. तर मुंबईत हेच दर अनुक्रमे १०९.९८ रुपये आणि ९४.१४ रुपये प्रतिलिटर एवढे आहेत. या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून दिल्लीमध्ये पेट्रोल ८ रुपयांनी स्वस्त म्हणजेच ९५.९७ रुपये प्रतिलिटर या दराने मिळणार आहे. त्यामुळे देशभर दिल्ली सरकारच्या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.
यासंदर्भातील घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दिल्ली सरकारकडून आत्तापर्यंत पेट्रोलवर तब्बल ३० टक्के व्हॅट अर्थात व्हॅल्यु अॅडेड टॅक्स आकारला जात होता. तो व्हॅट आता दिल्ली सरकारने थेट १९.४० टक्क्यांवर खाली आणला आहे. अर्थात, या व्हॅटमध्ये तब्बल १०.६० टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून, दिल्लीमध्ये आता पेट्रोल ८ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात ४ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी अनुक्रमे ४ रुपये आणि ८ रुपये प्रतिलिटर एवढी कमी केली होती. त्यामुळे काही प्रमाणात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर झाल्या होत्या