Home महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज :-अखेर ओबीसी आरक्षणाच्या कचाट्यात निवडणुका स्थगित?

ब्रेकिंग न्यूज :-अखेर ओबीसी आरक्षणाच्या कचाट्यात निवडणुका स्थगित?

  1.  

    ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवर पुढे निवडणुका,होणार राज्य निवडणूक आयोगाचे फर्मान.

    मुंबई न्यूज नेटवर्क :–

    ओबीसी आरक्षणाचा विषय अधिक गंभीर होत चालला असून आता त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत होत आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला असून यानुसार आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्यात १०६ नगरपंचायतींमधील ४०० जागांवर निवडणुका होणार होत्या. पण, ओबीसी आरक्षणावरील कायदेशीर पेचानंतर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

    स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षित जागांची निवडणूक जरी राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली असली तरी इतर प्रवर्गातील जागांवर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच निवडणुका होणार आहेत. राज्यात १०६ नगरपंचायतींमधील एकूण १ हजार ८०२ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. १,८०२ पैकी ३३७ जागांवर ओबीसी आरक्षण आहे. या व्यतिरिक्त भंडारा नगरपरिषदेत एकूण ५२ जागांवर निवडणूक होत आहे. त्यातील १३ जागा ओबीसी राखीव आहेत. त्यालाही स्थगिती मिळाली आहे. गोंदियातील जिल्हा परिषदेत ५३ पैकी १० ओबीसी जागांच्या निवडणुका स्थगित आहेत. पंचायत समितीत ४५ ओबीसी जागा आणि महानगरपालिकेची १ जागा यांच्या निवडणुकीलाही स्थगिती देण्यात आली. तसेच राज्यातील एकूण ५ हजार ४५४ ग्रामपंचायतींपैकी ७,१३० जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यातही ओबीसी राखीव जागांची निवडणूक स्थगित होणार आहे.

Previous articleधक्कादायक :- चक्क वडिलांच्या प्रेयसीची मुलांनीच केली हत्या.
Next articleमनसे इशारा :- चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here