Home क्राईम स्टोरी धक्कादायक :- चक्क वडिलांच्या प्रेयसीची मुलांनीच केली हत्या.

धक्कादायक :- चक्क वडिलांच्या प्रेयसीची मुलांनीच केली हत्या.

दोन मुलांना पोलीसानी घेतले ताब्यात. चंद्रपूरातील रमाबाई नगरातील घटना.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

असं म्हटल्या जात की प्रेम हे आंधळ असतं आणि ते कधीही कुणावरही होऊ शकतो असच एक प्रेम प्रकरण चंद्रपूर शहराच्या रमाबाई नगर येथे फळाला आलं पण त्यापासून एक संसार उध्वस्त होत होता त्यामुळे चक्क मुलांनी मिळून आपल्या वडिलाची प्रेमकहाणी कायमस्वरूपी संपविण्यासाठी वडिलाच्या प्रेयसीची निर्घूण हत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवार, 8 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास समोर आली आहे.

शहरातील रमाबाई नगर परिसरातील झरपट नदीच्या किनार्‍याजवळ ही घटना घडली असून मना मनोज कोठार असे मृतक महिलेचे नाव आहे.याप्रकरणी रामनगर पोलिसांनी दोघां मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी दिली.

अमरजीत चव्हाण व सुजीत चव्हाण असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बुधवारी झरपट नदी परिसरात एक महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांच्या चमुने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रत्यक्षदर्शी त्या महिलेची धारदार शस्त्राने हत्या केल्याची बाब निदर्शनास आली. याप्रकरणाचा रमाबाई नगरात तपास केला असता, मागील काही वर्षापासून मृतक महिला ही एकटीच वास्तव्य करीत असून, तिला एक मुलगी व दोन मुले आहेत. तिचा पती बाहेरी राज्यात मुलांसह राहतो. त्या दरम्यान याच नगरात वास्तव्य करणार्‍या एक कंत्राटदार शशीकपूर चव्हाण यांच्यासोबत तिचे प्रेम जुळले. याबाबतची माहिती चव्हाण यांच्या कुटुंबियांना झाली. या अनैतिक प्रेमप्रकरणावरून चव्हाण यांच्या कुटुंबियांत वाद व्हायचे.

दरम्यान वडिलाच्या प्रेमकहाणीचा कायम नायनाट करण्याचा बेत त्यांचा मुलगा आरोपी अमरजीत चव्हाण यांनी आखला. त्याने चुलत भाऊ सुजीतसोबत वडिलाच्या प्रेयसीवर पाळत ठेवली. बुधवारी ती प्रसाधनगृहास जात असताना तिच्या धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. त्यांच्याविरूद्ध हत्या व कट रचणे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती नंदनवार यांनी दिली. याप्रकरणाचा तपास रामनगर पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here