Home वरोरा वरोरा तालुक्यात मनसेच्या शाखा फलकांचे उद्घाटन,मनसे नेते राजूरकर यांची उपस्थिती.

वरोरा तालुक्यात मनसेच्या शाखा फलकांचे उद्घाटन,मनसे नेते राजूरकर यांची उपस्थिती.

गाव तिथे शाखा तयार करण्याचे मनसे पदाधिकारी यांचे प्रयत्न.

वरोरा प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा यशस्वी ऊद्दोजक रमेश राजूरकर यांच्या मागदर्शनाखाली व मनसे उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे, तालुका अध्यक्ष वैभव डहाने, तालुका सचिव कल्पक ढोरे,तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी आणि विभाग अध्यक्ष राजेंद्र धाबेकर यांच्या पुढाकाराने तालुक्यातील प्रत्त्येक गावात शाखा तयार करण्याचे काम जोरात सुरू असून मजरा, येंसा (लहान मजरा) व पारधी टोला या गावातील शाखा उद्घाटन झाल्यानंतर निमसडा येथे भव्य शाखा कर्यकारणीच्या फलकांचे अनावरण मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

मनसेच्या शाखा फलकांचे उद्घाटन मनसे नेते रमेश राजूरकर यांनी करून गावातील शेतकरी, शेतमजूर, बचत गटांच्या महिला यांच्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांना गावात शेतिपुरक व्यवसाय करून आपली आर्थिक बाजू कशी भक्कम करावी याचे उदाहरणांसह पटवून दिले. गावात कुणीही बेरोजगार राहणार नाही सर्वाना काम मिळेल आणि गावात आनंदाचे वातावरण राहील अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही आम्ह्च्या कडून प्रशिक्षण व मार्गदर्शन करू अशी ग्वाही राजूरकर यांनी उपस्थितांना दिली.

यावेळी शाखेचे अध्यक्ष गणेश महाडोळे,सचिव प्रशांत झिले, संघटक पंकज आसुटकर,कोषाध्यक्ष अतुल काळे, बूथ अध्यक्ष राजेश ढवस, गट अध्यक्ष विकास साळवे, सदस्य शुभम पोटे,सचिन मोहीतकर,राहुल ढवस,ओमप्रकाश मांदाडे, मनोज चौधरी,वैभव धवने,अमोल खांडाळकर,रोहित चौधरी,गणेश पारखी,राजू महाडोळे यांचे मनसे नेते रमेश राजूरकर,जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे तालुका सचिव कल्पक ढोरे विभाग अध्यक्ष राजेंद्र धाबेकर यांच्या हस्ते स्वागत व अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी निमसडा गावाचे उपसरपंच मडावी यांनी आभारप्रदर्शन करून मनसे तर्फे नवनियुक्त शाखा पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleदखलपात्र :- केंद्र सरकारने इम्पेरीकल डाटा दिल्यास ओबीसींचे आरक्षण वाचू शकते.
Next articleधक्कादायक :- चक्क वडिलांच्या प्रेयसीची मुलांनीच केली हत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here