Home चंद्रपूर मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षवेधक ठरवली  चंद्रपूर मनसे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक.

मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षवेधक ठरवली  चंद्रपूर मनसे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक.

जिल्ह्यात नेत्रूत्व परिवर्तन करण्यासाठी तालुका स्तरीय पदाधिकाऱ्यांच्या घेतल्या प्रतिक्रिया.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटन बांधणीला उभारी देण्यासाठी व अस्ताव्यस्त झालेल्या महाराष्ट्र सैनिकांमधे जोश भरण्यासाठी मनसेचे नेते अभिजित पानसे,सरचिटणीस तथा राज्य कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण व ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली, त्या बैठकीत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक व मनसे पदाधिकारी आले होते. या आढावा बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात नेत्रूत्व परिवर्तन व काही नव्या जबाबदाऱ्या देण्याचे सूचक विधान मुंबई च्या मनसे पदाधिकाऱ्यांनी दिल्याने इच्छुक पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांना घेऊन शक्ती प्रदर्शन केले.

जिन्दाबाद च्या घोषणाबाजी आली अंगलट?

पक्षाचे काही हौशी पदाधिकारी यांनी आपल्या समर्थकांत घोषणा देण्यासाठी सांगितल्याचे बोलल्या जात होते व स्टेजवर बसण्यासाठी चढाओढ होती मात्र या दरम्यान मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी त्या घोषणा देणाऱ्याची चांगलीच झडती घेऊन इथे अशा घोषणा चालणार नाही आम्ही फक्त तालुका स्तरांवर पदाधिकाऱ्यांना बोलावू त्यात आम्ही मुंबई वरून आलेले तीघेच राहणार बाकीच्यांनी बाहेर थांबावे असे बजावले.

अविनाश जाधव ठरले सर्वांचे आकर्षण. महाराष्ट्र सैनिकांमधे फोटो काढण्यासाठी चढाओढ. 

अख्ख्या महाराष्ट्रात मनसेचे तडफदार व युवा कार्यकर्त्याचे प्रेरणास्थान असलेले ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांचे विशेष लक्ष होते. व ते महाराष्ट्र सैनिकांचे प्रमुख आकर्षण होते, त्यामुळे त्यांच्या सोबत फोटो काढण्याची चढाओढ महाराष्ट्र सैनिकांमधे होती.दरम्यान मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा सच्चा महाराष्ट्र सैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे त्या अविनाश जाधव यांच्याकडे मोठ्या आशेने सच्च्या पदाधिकाऱ्यांनी आपली कैफियत मांडून त्यांच्यासारखाच कणखर व प्रामाणिक कार्यकर्त्याला नेत्रूत्व द्यावे अशी मागणी केली, या दरम्यान शक्ती प्रदर्शन करणाऱ्यांना अविनाश जाधव यांनी ज्या पध्दतीने खडे बोल सुनावले त्यावरून राजसाहेबांना खरी रिपोर्ट जाईल हे निश्चित.

येणाऱ्या निवडणुकांत ज्यांची कामगिरी दमदार त्यांच्याकडेच नेत्रूत्व द्या.

चंद्रपूर जिल्ह्यात जे समोर समोर करतात त्यांच्याकडे किती कार्यकर्ते आहेत हे तेंव्हा शीद्ध होईल जेंव्हा येणाऱ्या नगरपरिषद, महानगरपालिका व जिल्हापरिषद पंचायत समित्या निवडणुकीत ते आपल्या आपल्या क्षेत्रात प्रतिनिधी निवडून आणेल, कारण दिखावा जो केल्या जातो तो क्षणिक असतो व इकडून तिकडून जमवलेली गर्दी असते त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याला जिल्ह्याचे नेत्रूत्व तेंव्हा दिले जावे जेंव्हा त्यांच्या नेतृत्वात मनसेचे नगरसेवक जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून येईल. कारण आता संभावित नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रात जर नगरसेवक व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य निवडून आणण्याचे टार्गेट दिले तर खऱ्या अर्थाने पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो नाहीतर जर आत्ताच जिल्हा पदाधिकारी म्हणून नेत्रूत्व दिले व त्यांच्या नेत्रूत्वात सदस्य निवडून आले नाही तर ते म्हणतील की मी आता पदाधिकारी बनलो त्यामुळे आम्हाला अपयश आले.म्हणून पक्षाला येणाऱ्या निवडणुकांत फायदा करून घ्यायचा असेल तर पदाधिकाऱ्यांमधे स्पर्धा लावणे आवश्यक आहे. अर्थात ज्यांची कामगिरी दमदार त्यांच्या कडेच नेत्रूत्व देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी यांनी घ्यावा अशी निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्त्यां ची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here