Home वरोरा निमसडा गावातील नागरिक व शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेऊन पाण्याची अवैध विक्री?

निमसडा गावातील नागरिक व शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेऊन पाण्याची अवैध विक्री?

उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार. तहसीलदार यांच्याकडे चौकशी करण्याचे आदेश.

वरोरा प्रतिनिधी :-

निमसडा या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असून देवाजी विठूजी काळे यांनी निमसडा गावाला लागून असलेल्या स्वत:च्या शेतामध्ये ४०० फूट पेक्षा जास्त बोरवेल खोल मारून व त्यावर १२ एच.पी ची मोटर पंप टाकून कोढाळा गावातील भानदास बोधाने यांच्या शेतात पाणी पूरवित आहे. या संदर्भात उपविभागिय अधिकारी वरोरा यांचेकडे १०/०६/२०१९ ला तकार दाखल केल्यानंतर सुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने त्यानंतर ग्रामपंचायत निमसडा येथे तकार अर्जदेऊन व माहितीचा अधिकारनुसार दिनांक २०/०७/२०२० ला विचारणा केली असता मौजा निमसडा ते कोंढाळा पाईपलाईन टाकणेबाबत ग्रामपंचायतने कोणत्याही प्रकारची ना हरकत (एनओसी ) घेतली नसल्याची बाब उघड झाली.

बेकायदेशीर बोर व त्यातून होतं असलेल्या दुसऱ्या गावातील शेतकऱ्याला पुरवठा झाल्याने गावाच्या परिसरात पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने गावातील नागरिकांनी २२/११/०२१ पुन्हा उपविभागिय अधिकारी वरोरा यांना माहिती अधिकारानुसार अर्ज केला परंतु दिनांक १४/१२/२०२१ पर्यंत माहिती मिळालेली नाही. २२/११/०२१ ला माहितीच्या अधिकार नुसार तहसिलदार वरोरा यांना विचारणा केली असता त्यांनी अशी माहिती दिली आहे की मौजा निमसडा येथील बोरवेल मधून पाणी अंदाजे किमी अंतरावरील कोंढाळा या गावातील शेतक-याच्या शेतात पाईपलाईन व्दारे सातवारा भुमापन क्रमांक व उपविभाग २५६ सरकार गावठाण तसेच सातबारा मु.मा.क. उपविभाग ६७ याजागेतुन निमराडा ते कोंढाळा या रहदारीव्या रोडच्या बाजुला नालीने कोंढाळा या गावातील शेतक-याच्या शेतात नेण्यात येत असल्यामुळे कार्यालयाकडून परवानगी दिलेली नाही.

पाण्याची विक्री

निमसडा येथील देवाजी विठूजी काळें यांच्या शेतातून पाणी मौजा कोंढाळा येथील शेतकरी भानुदास बोधाने आपल्या शेतमध्ये पाणी नेत असून ते आपल्या शेताला पाणी देऊन भानुदास बोधाने स्वतःच्य मालकीच्या टॅकरव्दारे कोलमाईन्स बेलगांव खदान यांना विकत आहे असा आरोप होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here