Home वरोरा अपघात :- राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक दीपक जैस्वाल अपघातात थोडक्यात बचावले?

अपघात :- राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक दीपक जैस्वाल अपघातात थोडक्यात बचावले?

या  कार दुर्घटनेत दुभाजक ओलांडून कार ने दिली दुचाकीला धडक

वरोरा प्रतिनिधी – :-

राष्ट्रवादीचे चंद्रपूर शहर माजी अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दीपक जैस्वाल यांच्या गाडीला नागपूर – चंद्रपूर मार्गावरील टेमुर्डा येथील पेट्रोल पंप समोर नागपुर वरून चंद्रपूर कडे येताना मोठा अपघात झाला. ही घटना आज दिनांक 31रोज सोमवारला 2 वाजताच्या दरम्यान घडली. दीपक जयस्वाल हे त्यांच्या गाडी क्रमांक एम एच 34 बी आर 6886 ने नागपुर वरून चंद्रपूर जात असताना टेमुर्डा येथील पेट्रोल पंप जवळ समोरून अचानक टीप्पर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीला धडक दिली. यात जैस्वाल यांच्या गाडीची मोठी हानी झाली नाही पण दिपक जयस्वाल यांना गुप्ती मार लागला आहे.यामधे गाडी चालक उद्धव बन्सोड यांवह्या डोक्याला दुखापत झाली आहे तर दुचाकीस्वार रमेश चंद्रभान जेणेकर रा . पिचदुरा हे किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना उपचारांसाठी वरोरा येथे हलविण्यात आले. धडक एवढी जोरदार होती की चंद्रपूर दिशेने जाणाऱ्या कारने नागपूर मार्गावर वळण घेतली होती. त्यात जयस्वाल यांच्या गाडीचे मोठें नुकसान झाले आहे.

Previous articleनिमसडा गावातील नागरिक व शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेऊन पाण्याची अवैध विक्री?
Next articleअपघात :- राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक दीपक जैस्वाल अपघातात थोडक्यात बचावले?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here