Home चंद्रपूर प्रेरणादायी :- प्राध्यापक राजेश पेचे यांनी स्वखर्चाने दाखवला तब्बल 150 विद्यार्थ्याना झुंड...

प्रेरणादायी :- प्राध्यापक राजेश पेचे यांनी स्वखर्चाने दाखवला तब्बल 150 विद्यार्थ्याना झुंड चित्रपट.

चंद्रपूर जिल्ह्यात सामाजिक माध्यमांवर होत आहे प्राध्यापक पेचे यांच्या उदारतेची प्रचंड चर्चा.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस उलटले आहेत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. ‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांनी ‘झुंड’ चित्रपटाबद्दल विविध पोस्ट शेअर केल्या आहेत. पण हा चित्रपट विद्यार्थ्यांनी नक्कीच बघावा ही प्रेरणा देण्यासाठी शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयाचे प्राध्यापक राजेश पेचे यांनी स्वखर्चाने तब्बल 150 विद्यार्थ्याना टाकीज मधे झुंड हा चित्रपट दाखवून नवा अध्याय लिहिला असल्याची चर्चा रंगत आहे.

नुकतीच किरण माने यांनी ‘झुंड’ चित्रपटाबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी नागराज मंजुळे आणि ‘झुंड’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे यासोबत त्यांनी नागराज मंजुळे यांची एक कविताही शेअर केली आहे. ते म्हणतात की नागराज, लै लै लै वर्ष झाली. मी खाली पोस्ट केलेली तुझी, ‘तुझ्या येण्याअगोदर एक पत्र’ ही कविता वाचून अस्वस्थ झालो होतो. आज या कवितेचं ‘महाकाव्य’ करून तू मोठ्या पडद्यावरुन मांडलंस आणि अख्खा देश हलवून सोडलास. भारतीय सिनेमाच्या दिग्दर्शन, स्क्रीनप्ले संवाद लेखनाच्या सगळ्या रूढ चौकटी मोडून-तोडून तू खूप काही बदलतोस, सगळी बंधनं झुगारून देऊन तुझ्या मनातलं काहीतरी मांडतोयस…सहजपणे… ‘बघाच आणि समजून घ्याच’ असा आग्रह न करता ! या पिढीसाठीही आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तू ‘प्रेरणा’ ठरणार आहेस. लब्यू भावा”, असे किरण मानेंनी म्हटले आहे.

दरम्यान ‘झुंड’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ६.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी २. १० कोटी आणि रविवारी २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात या चित्रपटाने जवळपास ७ कोटींची कमाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here