Home वरोरा सनसनिखेज :- सिद्धिविनायक सहकारी पत संस्थेच्या संचालकांची स्थावर मालमत्ता जप्त होणार ?

सनसनिखेज :- सिद्धिविनायक सहकारी पत संस्थेच्या संचालकांची स्थावर मालमत्ता जप्त होणार ?

पतसंस्थेत कोट्यावधीचा घोळ आणि ग्राहकांची फसवणूक भोवनार ?

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहर व तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या श्री सिद्धिविनायक सहकारी पत संस्थेच्या संचालकांनी कोट्यावधी रुपयांचा घोळ केल्याने व ग्राहकांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तहसीलदार यांच्या दालनात झालेल्या सुनावणीत संस्थेच्या संचालकांनी ग्राहकांचे पैसे परत करावे अन्यथा संचालकांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल व प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय वरोरा तहसीलदार यांनी घेतल्याने संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहे. या संदर्भात शेवटची सुनावणी ही येत्या 16 मार्चला होणार असून या सुनावणीत काय निर्णय लागणार याकडे सिद्धिविनायक सहकारी पत संस्थेच्या ग्राहक व गुंतवणूकदार यांचे लक्ष लागलेले आहे.

सिद्धिविनायक सहकारी पत संस्थेच्या संचालकांनी गुंतवणूकदारांचे वेळीच पैसे परत केले नसल्याने जनआक्रोश सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अँड अमोल बावणे यांनी पोलीस महासंचालक यांच्यासह सहकार व पणन मंत्रालय मुख्य सचिव यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या दरम्यान तहसीलदार वरोरा यांच्याकडे सुद्धा प्रकरण दाखल केले होते त्यामुळे त्यांनी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांसह प्रशासक यांची बैठक घेऊन प्रकरण समजून घेतले या वेळी वार्षिक ऑडिट बघितले असता त्यात मोठा घोळ समोर आल्याने ग्राहकांचे पैसे संचालक मंडळांनी द्यावे अन्यथा संचालक मंडळाची स्थावर मालमत्ता जप्त करून त्यातून ग्राहकांचे पैसे परत करण्यात येईल असा निर्णय तहसीलदार मैडम यांनी दिला होता व येणाऱ्या 16 मार्चच्या सुनावणीत सर्व संचालकांनी आपल्या स्थावर मालमत्ता संदर्भातील दस्तावेज सादर करावे असा आदेश पण दिला होता त्यामुळे येणाऱ्या 16 मार्चला होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्ज वसुली व गुंतवणूकदार यांच्या ठेवी यामध्ये तफावत ? 

सिद्धिविनायक सहकारी पत संस्थेच्या संचालकांनी गुंतवणूकदारांचाय ठेवी देण्यास टाळाटाळ चालवली आहे त्याचा वेध घेतला असता संचालकांनी स्वतः व आपल्या जवळीकांना  पतसंस्थेतून कर्ज दिल्याची बाब समोर आली आहे शिवाय गुंतवणूकदारांच्या जेवढ्या ठेवी द्यायच्याआहे तेवढे पैसे संस्थेच्या कर्जदारांकडे नसल्याने लाखों रुपयांचा फरक जो दिसत आहे त्या पैशाचे नेमके झाले काय ? याबाबत ऑडिट रिपोर्टमधे  सुद्धा स्पष्ट होत नाही त्यामुळे सर्वाना मैनेज करून संचालकांनी लाखों रुपयांचा घोळ केला आहे हे स्पष्ट दिसत आहे.

Previous articleचिंताजनक :- कोरपणा परिसरात भुरटे व बोगस पत्रकारांचा सुळसुळाट ?
Next articleप्रेरणादायी :- प्राध्यापक राजेश पेचे यांनी स्वखर्चाने दाखवला तब्बल 150 विद्यार्थ्याना झुंड चित्रपट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here