Home कोरपणा चिंताजनक :- कोरपणा परिसरात भुरटे व बोगस पत्रकारांचा सुळसुळाट ?

चिंताजनक :- कोरपणा परिसरात भुरटे व बोगस पत्रकारांचा सुळसुळाट ?

स्थानिक तहसीलदार व ठाणेदार यांनी दखल घेण्याची गरज.

कोरपना प्रतिनिधी :-

देशाच्या लोकशाहीचा चौथा म्हणून ज्या पत्रकारिता क्षेत्राकडे मोठ्या आशेने बघितल्या जाते त्या पत्रकारितेत भुरटे।बोगस पत्रकारांचा भरणा होत असल्याने पत्रकारिता धोक्यात आली असल्याचा चिंताजनक प्रकार कोरपना तालुक्यात सध्या बघावयास मिळत असून ज्याना पत्रकारितेची एबीसीडी माहीत नाही कुठलेही उच्च शिक्षण नाही अशा भुरटे व बोगस पत्रकारांचा सुळसुळाट कोरपणा तालुक्यात चर्चेचा विषय बनत चालला आहे. याकडे स्थानिक उपविभागीयपोलीस अधिकारी, aतहसीलदार व ठाणेदार यांनी वेळीच दखल घेतली नाही तर पुन्हा नवीन भुरटे बोगस पत्रकारांचा उदय होऊन चिरीमिरीसाठी हाणामाऱ्या होणार असल्याची शक्यता निर्माण होत आहे.

कोरपणा तालुका हा आदिवासी बहुल दुर्गम भाग असून इथे प्रशासकीय अधिकारी ठेकेदार यांच्याकडून  करत काही संधीसाधू बोगस पत्रकार पैशाची मागणी करून त्यांना धमक्या देत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधलेले  न्यूज पोर्टल व ज्यांच्याकडे शिक्षण पात्रता नाही अशांना मिळत असलेले पत्रकारांचे ओळखपत्र यामुळे जणू यांना पैसे कमावण्याचा राजमार्गमिळाला की काय ? असाप्रश्न निर्माण होत असून अशा भुरटे व बोगस पत्रकार बोगस पत्रकारांचा वेळीच बंदोबस्त कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Previous articleसंतापजनक :- बेकायदेशीर फेरफार व विक्रीच्या आधारे निशा साठे हिची गुंडांना घेऊन शेतात दादागिरी,
Next articleसनसनिखेज :- सिद्धिविनायक सहकारी पत संस्थेच्या संचालकांची स्थावर मालमत्ता जप्त होणार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here