Home वरोरा संतापजनक :- बेकायदेशीर फेरफार व विक्रीच्या आधारे निशा साठे हिची गुंडांना घेऊन...

संतापजनक :- बेकायदेशीर फेरफार व विक्रीच्या आधारे निशा साठे हिची गुंडांना घेऊन शेतात दादागिरी,

शेतकरी भदुजी शिंदे यांच्या शेतात नेली जेसीबी मशीन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार.

वरोरा प्रतिनिधी :-

आमदार बंटी भांगडीया यांचा भाऊ व माजी आमदार मितेष भांगडीया यांचा मुलगा श्रीकांत मितेष भांगडीया व दीपक उराडे यांच्या नावाने निशा विलासराव साठे यांनी मौजा येन्सा भुमापन क्रमांक 156 आराजी 5.51 पैकी 4.88 हे आर जमीन बेकायदेशीर फेरफार व नंतर विक्री करून दिल्याने भदुजी शिंदे या शेतकऱ्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केली होती परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुद्धा निशा साठे या महिलेने ती जमीन हडपण्यासाठी नानाविध प्रयोग चालवले असून आज सकाळी जेसीबी मशीन सह काही गुंडांना दोन गाड्या भरून शेतात कब्जा करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती असून या संदर्भात शेतकरी शिंदे यांनी पोलीस स्टेशन मधे धाव घेतली आहे.

वरोरा तालुक्यातील मौजा येन्सा येथील भुमापन क्रमांक 156 आराजी 5.51 शेत जामीन निशा साठे या महिलेने तहसीलदार कोळपे व उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत संगनमत करून ती परस्पर आमदार बंटी भांगडीया यांच्या श्रीकांत नावाच्या भावाला विकली व शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचा प्रयत्न केल्याने पीडित शेतकरी भदुजी गूजबराव शिंदे यांनी चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती दरम्यान आता निशा साठे या महिलेने गुंडांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात ताबा करण्याचा प्रयत्न चालवला असल्याने आता पोलीस प्रशासन काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here