Home वरोरा संतापजनक :- कोंढाळा गाव शिवारात जनावरांच्या गोठ्याला लावली आग ?

संतापजनक :- कोंढाळा गाव शिवारात जनावरांच्या गोठ्याला लावली आग ?

चार जनावरांचा आगीत होळपळून जागीच मृत्यू तर एक जनावर गंभीर जखमी.

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील कोंढाळा या गावातीलरवींद्र अहिरकर वय 43 या युवा शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या गोठ्याला आग लावून काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी चार जनावरांना ठार करून एकाला गंभीर जखमी केल्याचा खळबळजनक प्रकार घडल्याने या परिसरात संताप व्यक्त होत आहे.

रवींद्र ऋषींजी अहिरकर यांचे शेत कोंढाळा शिवारात गावापासून जवळपास अडीच किलोमीटर दूर असून तिथे तीन गाई व दोन बैल होते सोबतच जवळपास 10 क्विंटल कापूस व इतर शेतीची औजरे गोठ्यात होती ते सर्व जळून खाक झाले असून ही आग नेमकि कुणी लावली याचा शोध पोलिसांनी घ्यावा, त्या विघ्नसंतोषी व्यक्तींना अटक करावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी होत आहे.

Previous articleधक्कादायक :- निलजई गावांत बोगस डॉक्टर अमित विश्वासकडून रुग्णांची आर्थिक लूट ?
Next articleसंतापजनक :- बेकायदेशीर फेरफार व विक्रीच्या आधारे निशा साठे हिची गुंडांना घेऊन शेतात दादागिरी,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here