Home वरोरा धक्कादायक :- निलजई गावांत बोगस डॉक्टर अमित विश्वासकडून रुग्णांची आर्थिक लूट ?

धक्कादायक :- निलजई गावांत बोगस डॉक्टर अमित विश्वासकडून रुग्णांची आर्थिक लूट ?

बिना डिग्री तब्बल 8 वर्षांपासून करतोय चार गावातील रुग्णांवर उपचार. आरोग्य प्रशासन साखर झोपेत ?

वरोरा प्रतिनिधी :-

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकत असताना व काही बोगस डॉक्टरांवर आरोग्य प्रशासनाकडून कारवाई झाली असताना वरोरा तालुक्यातील निलजई या गावांत मात्र तब्ब्ल 8 वर्षांपासून अमित विश्वास नावाचा बिना डिग्री चा बोगस डॉक्टर स्थानिक आरोग्य प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता जवळपास चार टे पाच गावातील रुग्णांवर स्वतःजवळच्या गोळ्या व इंजेक्शन देऊन उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आल्याने आरोग्य प्रशासन एवढी वर्ष साखर झोपेत आहेत का ? असा गंभीर सवाल उठत आहे.

दुखणं कंबरेच इलाज भलतीकडेच ?

बोगस डॉक्टर अमित विश्वास ग्रामीण जनतेच्या अशिक्षितपनांचा फायदा घेऊन जणू रुग्णांना घाबरवण्यासाठी बिमारी कुठलीही असो त्याचा बीपी चेक करतात अशातच एका रुग्णांला तर कंबरेला दुखणे असताना त्यांची बीपी चेक करण्यात आली यावरून ह्या बोगस डॉक्टरांनी आतापर्यंत किती रुग्णांना उल्लु बनवले असेल याचा नेम नाही. महत्वाची बाब म्हणजे त्या डॉक्टर ला त्यांच्या डिग्री विषयी विचारले असता तो नागपूर वरून बी ए एम एस झाला असल्याचे तो सांगतो मात्र त्याच्याजवळ स्थानिक जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून कुठलीही परवानगी नाही अशी प्रथमदर्शनी माहिती असून ग्रामीण जनतेची हा डॉक्टर मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करत असल्याचे बोलल्या जात आहे.

दररोज किती कमाई करतो हा डॉक्टर ?

निलजई या गावाशेजारी जवळपास चार ते पाच गाव आहेत व या गावाची लोकसंख्या जवळपास सहा ते सात हजार एवढी आहे. दरम्यान या गावातील बहुतांश रुग्ण हे याच बोगस डॉक्टर कडे आपला इलाज करीत असल्याची माहिती असून दररोज पाच ते दहा हजार रुपयांची तो कमाई करत असल्याची चर्चा आहे.

ह्या डॉक्टर चे पाठीराखे कोण ?

ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ह्या बोगस डॉक्टरांचे कोण पाठीराखे आहेत याबद्दल चौकशी केली असता या गावातील सरपंच व माढेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर या बोगस डॉक्टरची  पाठराखण करीत असल्याचे खुद्द ह्या बोगस डॉक्टर ने सांगितले असल्याने हा चिंतेचा विषय ठरला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे होणार तक्रार?

ग्रामीण जनतेच्या अशिक्षितपनाचा फायदा घेऊन दररोज शेकडो रुग्णांवर उपचार करणाऱ्या या डॉक्टर च्या इलाजा ने जर कोणत्या रुग्णांचा जीव गेला तर यांची जबाबदारी कोण घेणार ? हा गंभीर प्रश्न असून या संदर्भात चार गावातील जनतेच्या समस्या समजून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here