Home वरोरा आक्रोश :-  गैसच्या महागाईने चुलीच्या धुरात महिलांच्या डोळ्यात पाणी ?

आक्रोश :-  गैसच्या महागाईने चुलीच्या धुरात महिलांच्या डोळ्यात पाणी ?

मोदी सरकारच्या विरोधात महिलांचा आक्रोश, पुन्हा ग्रामीण महिलांच्या नशिबात चुल.

खांबाडा
मनोहर खिरटकर.

केंद्र सरकारने सुरवातीला दारीद्ररेषेखालील कुंटुबाला स्वस्तदरात गँस दिला आणि तो मिळविण्यासाठी धक्काबुक्की खात रांगा लावून तो मिळवला तेव्हा महिलांनी आंनद व्यक्त करून मोदी सरकारचे धन्यवाद मानले मात्र गरिबीचे चटके खाणाऱ्या त्या महिलांना काय माहीत की मोदी सरकार एवढी निष्ठुर आणि फसवणूक करणारे असेल की गैसवर स्वयंपाक हा क्षणिक ठरणार आहे ? खरं तर मोदी सरकार ने जो गैस सिलेंडर मोफत दिल्याचा डंका पिटवला तो गैस सिलेंडर मोफत नव्हता तर ग्राहकांना गैस कनेक्शनच्या मूल्याच्या पैशापेक्षा मिळणारी सबसिडी ही त्यापेक्षा जास्त होती त्यामुळे उलट उज्वला गैस योजनेतून गरिबांच्या महिलांची मोठी आर्थिक पिळवणूक ही मोदी सरकारने केली आणि आता गैस सिलेंडर वरची सबसिडी काढून गरीब महिलांना पुन्हा त्यांच्या परंपरागत चुलिच्या धुरात डोळ्याला पाणी आणण्याच्या प्रकार मोदी सरकारने केल्याने मोदी सरकारच्या विरोधात महिलांनी अक्रोश व्यक्त करणे सुरू केले आहे.

सरकार गरीबांचे कैवारी आहे की आर्थिक शोषण करणारे हे आता नव्याने संशोधन करण्याची वेळ जनतेवर आली आहे, कारण गँस सिलेंडर च्या किमंती आवाक्याबाहेर झाल्याने महिलांचे डोळे चुलिच्या धुरात अश्रूत बुडाले आहे आणि त्यांच्या नशिबी शिल्लक राहिली ती फक्त धूर निघणारी चूल त्यामुळे ग्रामीण महिला व मोलमजुरी करणारी महिला ही संतापली असून दररोज ची जिंदगी त्यांची धुरात जात आहे.ग्रामीण भागातील महिलाना दररोज नित्यनेमाणे चुलीवर कराव्या लागणार्या स्वयंपाकासाठी सकाळी लवकर उठून व ठरलेली कामे उरकवून मिळेल त्या कामावर जाण्याऐवजी आता चुलीसाठी सरपण गोळा करणे नित्याचे झाल्याने रानावणात जाणे भाग पडत आहेत , राणावणातील काटाकुट्यातून हात घालून तर कधी शिव्याशाप घेवून सरपण जमा करून वेळेच्या आत घरात माघारी येवून दोन घास अन्न खावून कामावर जावे लागते तेंव्हाच मिठमिरचीला दोन पैसे मिळतात,खांबाडा परिसरात दारीद्र रेषेखालील अनेक कुटुंब आहे याच कुंटुंबाला मिळालेल्या सिलेंडर गँसमुळे सुरवातीला आंनद झाला होता आणि स्वयंपाकपाणी,तथा घरातील कामे आटोपून मजुरीला जाणे व्हायचे आणि त्याच मजुरीतुन घरखर्च होवून चार पैसे शिल्लक रहायचे मात्र आता याच्या उलट झाले ते या महागाईत गँसच्या किंमती अव्वाच्यासव्वा वाढल्याने गँसचा हंडा भरून आणण्यापेक्षा रानात जावून सरपण आणण्याला पंसती देणे भाग पडते,आतामात्र तो रिकामा असलेला हंडा कोपर्यात पडून तो म्हणतो आता कधीतरी मला माझ्या प्रिय कुंटुंबासाठी कामी पाडते असे शब्द जणू कानी पडण्याचा भास आम्हा महिलाना होतो ,तथा स्वयंपाकासाठी सरपण जमवणे आणि चुलीच्या धुरामुळे जीवाचे हाल होतात तरी कशी बर या आमच्या मायबाप असणार्या सरकारला जराही दया येत नसावी अशी खंत परिसरातील महिला व्यक्त करत आहेत .,

सरपणासाठी जाणाऱ्या महिलांवर वाघांच्या हल्ल्याची भीती ?

सरकारने गोरगरीब,कष्टकरी,कामगार कुंटुंबाचा विचार करून स्वस्तदरात मिळणारी सिलेंडर गँसची दरवाढ करून हजारावर नेवून ठेवल्याने महिलांना तो गैस सिलेंडर रिकामा ठेऊन चुलिच्या सरपणा साठी जंगलात जावे लागते मात्र जंगलात वाघांची भीती असल्याने आता सरपण आणायचे कुठून ?हा प्रश्न महिलांना पडला आहे त्यामुळं गैस सिलेंडर च्या किमंती कमी कराव्यात अशी महिलांची मागणी आहे. “झाडे लावा,झाडे जगवा; झाडे जगवा,जंगल वाढवा” अशी घोषणा करणार्या शासनाने आता गैस सिलेंडर चे भाव वाढविल्याने जंगलातील झाडांची कत्तल होणार आहे हे निश्चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here