Home धक्कादायक धक्कादायक :- कोळशाची टंचाई दाखवून महाविकास आघाडी सरकारची लोडशेडींग ?

धक्कादायक :- कोळशाची टंचाई दाखवून महाविकास आघाडी सरकारची लोडशेडींग ?

केंद्राने कोळशाची आपूर्ति वाढवली असतांना महाऔष्णिक वीज केंद्राचा कोळसा जातो कुठे ?

चंद्रपूर :-

सध्या महाराष्ट्रात तापत असलेला उन्हाळा आणि मोठ्या प्रमाणात होत असलेला विजेचा वापर यामुळे महाविकास आघाडी सरकारने वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते पण या सरकारने लोडशेडींग चा गेम प्लान तयार करून कोळशाचा तुटवडा असल्याचे कारण समोर केले आहे मात्र या संदर्भात
प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्ताला उत्तर देताना, केंद्रीय मंत्रालयाने सांगितले की, सद्यस्थितीत राज्य त्यांची कोळशाची गरज भागवत आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना (टीपीपी) 70.77 दशलक्ष टन (एमटी ) कोळशाचा पुरवठा करण्यात आला, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

केंद्राने राज्यातील महाऔष्णिक वीज केंद्रात पाठवल्या जाणाऱ्या कोळशाची आपूर्ति वाढविली असली तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने म्हटले आहे की, कोळशाची टंचाई असून योग्य पुरवठा होत नसल्याने राज्यात वीज टंचाई निर्माण झाली आहे. मात्र याची दखल घेत केंद्रीय कोळसा मंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे. विजेच्या मागणीत होत असलेल्या वाढीनुसार औष्णिक प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा वाढवला जात आहे, असे कोळसा मंत्रालयाने सांगितले. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मार्च 2022 मध्ये, महाराष्ट्रातील वीज प्रकल्पांना दररोज 2.14 लाख टन कोळशाचा पुरवठा होत होता.हा कोळसा पुरवठा या महिन्यात/एप्रिल, 11.04.2022 पर्यंत दररोज 2.76 लाख टन पर्यंत वाढला आहे.

केंद्राच्या कोळसा पुरवठा आकडेवारी चा वेध घेतला तर
महाजेनकोला 2021-22 मध्ये 37.131 मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा करण्यात आला आहे. महाजेनकोला मार्च – 22 मध्ये होणारा दैनंदिन कोळसा पुरवठा 0.96 लाख टन प्रतिदिन होता जो एप्रिलमध्ये (11.04.22 पर्यंत) 1.32 लाख टन प्रतिदिन झाला आहे. महाजेनकोकडे सुमारे 2390 कोटी रुपयांची थकबाकी असतानाही महाराष्ट्राची कोळशाची गरज भागवली जात असताना केंद्राने कोळशाची आपूर्ति वाढवली तर महाऔष्णिक वीज केंद्राचा कोळसा जातो कुठे ? असा प्रश्न उभा राहत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here