Home क्राईम स्टोरी संतापजनक :- गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा. शिक्षकाने केला तब्बल ६ विद्यार्थिनीवर अत्याचार.

संतापजनक :- गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा. शिक्षकाने केला तब्बल ६ विद्यार्थिनीवर अत्याचार.

चंद्रपूर जिल्हातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ तर नागरिकांमध्ये संतापाची लाट, नराधम शिक्षक गजाआड.

क्राईम वार्ता :-

जिथे कुंपणच शेत खात असेल तर बाहेरील जनावरांपासून धोका तो काय ? अशीच परिस्थिती आता शैक्षणिक क्षेत्रात घडत असून शिक्षकच विद्यर्थिनिवर अत्याचार करत असेल तर बाहेरील नराधमांची आवश्यकता ती काय ?असा गंभीर प्रश्न समोर येत आहे. असाच एक दुर्दैवी व तितकाच संतापजनक प्रकार जिवती तालुक्यात घडला असून एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेतच विनयभंग करणाऱ्या शिक्षकास जिवती पोलिसांनी गजाआड केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या व दुर्गम भाग असलेल्या जिवती तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अच्युत खोवाजी राठोड वय 49 वर्ष हा शिक्षक मागील वर्षभरापासून शाळेतील विविध मुलींशी असभ्य वर्तन करत होता. प्राप्त माहितीनुसार शाळेच्या परीक्षा झाल्यानंतर पेपर तपासणी सुरू होती दरम्यान सदर शिक्षकाने एका मुलीला पेपर तपासण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावले व त्या मुलीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.

अच्युत खोवाजी राठोड ह्या शिक्षकाने पीडित मुलीला कार्यालयात बोलावून तिच्या छातीला कुरावळणे व छातीला तोंड लावणे सुरू केले एव्हढेच नाही तर तिच्या गुप्तांगात बोट सुद्धा घातले. ह्या घटनेने भेदरलेल्या अल्पवयीन मुलीने तत्काळ घरी धाव घेऊन पालकांना घडलेला प्रकार सांगितला.

घटनेची माहिती मिळताच पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या नराधम शिक्षकाला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी केली असता शाळेतील एकुण सहा मुलींवर त्याने असाच अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात येताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार ह्यांनी घटनास्थळी धाव घेतली व गडचांदुर येथील बाल अत्याचार प्रतिबंध विभागाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे ह्यांच्या नेतृत्वात अपराध क्रमांक 35/2022 नुसार भा दं वी च्या कलम 354(अ), 376(अ) 376(2)(एन) सह बाल लैंगिक अपरधापासून संरक्षण कायद्याच्या कलम 4, 6, 8,12 अन्वये गुन्हा नोंद केला असुन आरोपी शिक्षकाला गजाआड केले आहे.

Previous articleधक्कादायक :- कोळशाची टंचाई दाखवून महाविकास आघाडी सरकारची लोडशेडींग ?
Next articleमनसे वार्ता :- मनसेच्या वरोरा तालुक्यातील सालोरी गाव शाखा फलकांचे थाटात उद्घाटन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here